She went to the doctor due to stomach ache and got pregnant Nagpur crime news 
नागपूर

अत्याचारानंतर तरुणी गर्भवती; तक्रारीवरून पोलिसांनी दाखल केला गुन्हा

अनिल कांबळे

नागपूर : पोटात दुखत असल्यामुळे १७ वर्षीय विद्यार्थिनी आईसह डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी तपासून ती अडीच महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे तिच्या आईला धक्का बसला. तिने डॉक्टरांवर विश्‍वास न बसल्यामुळे पुन्हा तपासणी करण्याची विनंती केली. खरी बाब समोर आल्यानंतर नातेवाइकांनी मुलीसह पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी अज्ञात आरोपीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय मुलगी मानकापूर भागात राहते. ती बारावीची विद्यार्थिनी असून, जानेवारी महिन्यात शिकवणी वर्ग आटोपून पायी घरी जात होती. झिंगाबाई टाकळी परिसरात मोटरसायकलवर आलेल्या युवकाने तिला अडविले व मारहाण केली. विद्यार्थिनी बेशुद्ध झाली. त्यानंतर युवकाने तिला झाडाझुडपात नेऊन बलात्कार केला.

काही वेळाने तरुणी शुद्धीवर आली. ती घरी गेली. घडलेला प्रकार तिने कुणालाच सांगितला नाही. १९ मार्चला तरुणीच्या पोटात दुखू लागले. नातेवाइकांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेले. ती अडीच महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. तरुणीच्या नातेवाइकाने मानकापूर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

बलात्काराचा बनाव?

मुलगी शिकवणीवरून येताना दुचाकीस्वार युवकाने विनाकारण मारहाण केली आणि कुणीही मदतीसाठी धाव घेतली नाही. तसेच बेशुद्ध मुलीला दुचाकीवरून निर्मनुष्य ठिकाणी नेले आणि तेथे बलात्कार केला, या थेअरीवर पोलिसांचा विश्‍वास बसत नाही. त्यामुळे बलात्काराचा बनाव तर केला नाही, असा संशय पोलिसांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT