file photo
file photo 
नागपूर

उमरेडच्या सृष्टी शर्माची सहा वर्षांत चारवेळा 'गिनीज बुक'मध्ये नोंद !  

नरेंद्र चोरे


नागपूर : जगातील आव्हानात्मक व प्रतिष्ठेच्या 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'मध्ये स्थान मिळविण्यासाठी अनेक जण प्रयत्नांची पराकाष्टा करतात. पण त्याउपरही यश मिळत नाही. मात्र उमरेडची युवा लिंबो स्केटर सृष्टी शर्मा हिने एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल चारवेळा 'गिनीज बुक'मध्ये आपले नाव नोंदवून साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या ऐतिहासिक कामगिरीनंतर सृष्टीने आता जगातील सर्वात वेगवान महिला स्केटर होण्याचा मानस व्यक्त केला आहे. 


उमरेडसारख्या छोट्या जन्मलेल्या १६ वर्षीय सृष्टीचा स्केटिंगमधील आतापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. वयाच्या चौथ्या वर्षी स्केटिंगला सुरुवात करणाऱ्या सृष्टीने जिल्हा, विभागीय, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा गाजवत थेट गिनीज बुक गाठले. राज्य स्पर्धांमध्ये दोन सुवर्णांसह तीन पदके आणि गुडगाव येथील राष्ट्रीय स्पर्धेत ब्रॉंझपदक जिंकल्यानंतर २०११ मध्ये लिंबो स्केटिंग करायला सुरुवात केली. अवघ्या तीन वर्षांत (२०१४ मध्ये) १० मीटरमध्ये वेगवान लिंबो स्केटिंग करून सृष्टीने पहिल्यांदा गिनीज बुकमध्ये आपल्या नावाचा समावेश केला. त्यानंतर २०१५ (२५ मीटरमध्ये), गुरुग्राम येथे २०१७ (२० मीटरमध्ये) आणि २००२ मध्ये पुन्हा कामगिरीची पूनरावृत्ती करून आपल्यातील टॅलेंट जगाला दाखवून दिले.

सेंटर पॉइंट स्कूलची (वर्धमाननगर) विद्यार्थिनी असलेल्या सृष्टीने गेल्या जानेवारी महिन्यात शाळेच्या परिसरात आयोजित अंडर-10 बार लिंबो स्केटिंग प्रकारात सर्वात वेगवान वेळेची नोंद करीत हा विक्रम नोंदविला होता. तिने हा विक्रम करताना केवळ बारा इंच उंचीच्या बारमधून अवघ्या १.७२० सेकंद वेळेत नऊ मीटर अंतर पूर्ण केले, हे उल्लेखनीय. असा पराक्रम करणारी सृष्टी नागपूर व विदर्भाची पहिली महिला स्केटर ठरली आहे. सृष्टीच्या चारही विक्रमांना गिनीज बुककडून मान्यता मिळाल्याचे तिचे वडील धर्मेंद्र शर्मा यांनी सांगितले. लिम्का व इंडिया बुकमध्येही सृष्टीने आपला ठसा उमटविला आहे. 

'गिनीज बुक'मध्ये विक्रमांचा चौकार लगावल्यानंतर सृष्टीचे स्वप्न आता ५० मीटरमध्ये जगातील सर्वात वेगवान महिला स्केटर होण्याचे आहे. या प्रकारात तिने ५० मीटर अंतर ७.९८ सेकंदात पूर्ण केल्यास तो नवा विश्वविक्रम ठरणार आहे. याशिवाय ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचेही तिचे स्वप्न आहे. दहावीच्या परीक्षेत ८४ टक्के गुण मिळविणाऱ्या सृष्टीने भविष्यात डॉक्टर बनून भारतीय सेनेत सेवा करण्याची इच्छादेखील बोलून दाखविली. हे तिहेरी स्वप्न पूर्ण करण्यासाठी सध्या ती कठोर मेहनत घेत आहेत. सृष्टी ही ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या अभियानाशीही जुळली आहे. या माध्यमातून ती मुलींना शिक्षण देण्याचे पालकांना आवाहन करीत असते. 

सृष्टीसाठी वडीलच गुरू 

राष्ट्रीय स्तरावरील स्केटर राहिलेल्या थोरल्या बहिणीला (सिध्दी) पाहून स्केटिंगमध्ये करिअर करणाऱ्या सृष्टीला कुणीही प्रशिक्षक नाही. तिचे पिता धर्मेंद्र शर्मा हेच तिचे गुरू आहेत. उमरेडच्या वेकोलित नोकरी करणारे धर्मेंद्र यांना स्केटिंगचे अजिबात ज्ञान नाही. मात्र मुलींच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते त्यांच्या पाठीशी उभे राहिले. नोकरी, घर आणि मुलींचं करिअर, असा तिहेरी भार पेलत त्यांनी आपल्या मुलींना घडविले.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT