file photo 
नागपूर

"ती' रात्रीच चढते झाडावर अन् पाने, फुले करते फस्त...कोण आहे ती?...वाचा सविस्तर

शरद शहारे

वेलतूर (जि. नागपूर) : पावसाळ्यात विविध कीटक, पशु-पक्ष्यांच्या प्रजाती आढळून येत आहेत. वेलतूर परिसरातील पिकांवर गोगलगाईने आक्रमण केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वेलतूर परिसरात मोठ्या प्रमाणात गोगलगाई आढळून येत आहेत. त्या पिकांवर मोठ्या प्रमाणात आक्रमण करीत असल्याने शेतकरीही त्रस्त झाले आहेत.

कीटकनाशके फवारणी केल्यावरही त्यांचा बंदोबस्त करणे कठीण होत आहे. मात्र सध्या तरी शेतकऱ्यांच्या समोर तिच्यापासून आपले पीक कसे वाचविता येईल, हा प्रश्न उभा ठाकला आहे.

वर्षभर न दिसणारी गोगलगाय पावसाळ्यात हमखास आपल्या नजरेस पडत आहे. गोगलगाय पावसाळ्यात रस्त्यावर, माळावर, शेतात मुक्तसंचार करीत असते. रात्रीच्या वेळी पिकांवर तिचे आक्रमण होत असते.
अतिशय संथगतीने चालणारी ही गोगलगाय शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. पावसाळा सुरू झाला की आपल्याला घरातल्या कुंडीपासून बगीच्यापर्यंत सर्व ठिकाणी ती दिसून येते. इतर हंगामात मात्र ती तलावामध्ये, नदीमध्ये आढळून येते.

जून ते सप्टेंबरमध्येच जास्त सक्रिय

पावसाळ्यात मात्र वेलतुरात ती झाडावरील पाने, फुले फस्त करीत आहे. गोगलगाय एका जागी निपचित पडली की तिथेच चिकटून बसते. साधारणतः गोगलगाईला जिवंत राहण्यासाठी ओलाव्याची गरज असते. त्यामुळे गोगलगाय फक्त जून ते सप्टेंबर महिन्यातच आपल्याला जास्त सक्रिय दिसते. इवलिशी दिसणारी गोगलगाय सुमारे 25 वर्ष जगते. गोगलगाईला पाय नसल्याने तिच्या शरीरातून निघणाऱ्या एका विशिष्ट प्रकारच्या स्त्रावामुळे तिला पुढे सरकण्यास मदत होते. यामुळे तिचे मोलस्क या प्राणी वर्गात वर्गीकरण केले जाते. यामध्ये शंख, शिम्पले, कालवे हे प्रकारसुद्धा येतात. शरीराच्या संरक्षणासाठी त्यांना जन्मजात एक कठीण शंख असतो.

सडलेल्या भाज्या, पाने, लाकूड आहार

बहुतांश गोगलगाई या निशाचर असतात. रात्री किंवा ढगाळ वातावरणात त्यांचा वावर जास्त असतो. त्यामुळेच त्या शेतातील पिकांवर आक्रमण करून पाने, फुले, फळे नष्ट करतात. निसर्गात या गोगलगाई सडलेल्या भाज्या अथवा पाने, बुरशी, अळंबी, कुजलेले लाकूड खाऊन आपला उदरनिर्वाह करतात. भारतातील काही दुर्गम भागात गोगलगाय हा प्राणी चुलीवर शिजवूनही खाल्ला जातो. त्याला snail curry (गोगलगाईचा रस्सा) असेही म्हणतात.

पर्यावरणातील दुर्लक्षित घटक

गोगलगाय हा पर्यावरणातील एक उपयुक्त घटक आहे. दिवसेंदिवस या प्रजातीतील गोगलगाईंची संख्या कमी होत चालली आहे. खरे म्हणजे पर्यावरणातील कीटक हा फार दुर्लक्षित घटक आहे. साधारणतः आकाराने लहान आणि सहज नजरेला न पडणारे हे जीव पायाखाली चिरडले गेल्यावरच त्याची जाणीव होते.
अतिशय नाजूक आणि स्वतःच्या शरीराचे घर करून राहणारी ही गोगलगाय पर्यावरणातून लोप पावते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत महान देश, माझा मित्र तिथं टॉपचा नेता; शरीफ यांच्यासमोर ट्रम्पकडून PM मोदींचं कौतुक

Weather Update : 'मॉन्सून'बाबत महत्त्वाची अपडेट! महाराष्ट्रातील बहुतांश भागांतून पावसाची माघार; हवामान विभागानं काय सांगितलं?

ICC Womens World Cup 2025 : स्पर्धेत राहण्यासाठी टीम इंडिया स्ट्रॅटेजी बदलणार? दोन पराभवानंतर हरमनप्रीत कौरला कठोर निर्णय घ्यावेच लागणार...

Latest Marathi News Live Update : पुणेकरांची दिवाळी यंदा धूमधडाक्यात! फटाक्यांची दुकानं राहणार २४ तास खुली

Solapur News: 'शेतकऱ्यांचा माजी गृहराज्यमंत्र्यांच्या दारात टाहो'; दोन वर्षांपासून पाच कोटींची रक्कम थकवली, साेलापुरात बेमुदत उपोषण

SCROLL FOR NEXT