snake friend gave his friend a poisonous snake on birthday nagpur Sakal
नागपूर

Nagpur Crime : सर्पमित्राने केला वाढदिवशी मित्राचा घात, हातात दिला विषारी साप अन्...

सर्पमित्राने मित्राच्या वाढदिवशी त्याच्या हातात विषारी सर्प देण्याचा प्रयत्न केला. यात सर्पदंश झाल्याने अत्यवस्थ झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

चिखली : सर्पमित्राने मित्राच्या वाढदिवशी त्याच्या हातात विषारी सर्प देण्याचा प्रयत्न केला. यात सर्पदंश झाल्याने अत्यवस्थ झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. संतोष जगदाळे (वय ३१) असे मृतकाचे नाव आहे. ही घटना ५ जुलै रोजी घडली होती. प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी ८ जुलैच्या पोलिसात तक्रार करण्यात आल्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

मृतक युवकाच्या वडिलांनी सोमवारी चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. सदर घटना ५ जुलै रोजी संध्याकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली. चिखलीतील गजानननगर येथील रहिवासी संतोष जगदाळे (३१ वर्ष) याचा ५ जुलै रोजी जन्मदिवस होता.

गजानननगर येथील त्याचे मित्र वाढदिवस साजरा करण्यासाठी जमले होते. संतोषचा वाढदिवस करायचा म्हणून मित्रांनी संतोषला बाहेर आणले, यावेळी त्याचा मित्र आरिफ खान रहीस आणि धीरज पंडितकर हे देखील तिथे उपस्थित होते. आरिफ हा सर्पमित्र असून तो नेहमी विविध प्रकारचे साप वागवतो.

संतोष जगदाळे याचा वाढदिवस साजरा करत असताना आरिफ व धीरजने त्याच्या जवळील विषारी साप संतोषच्या हातात देण्याचा प्रयत्न केला. यात सर्पदंश झाल्याने संतोष अत्यवस्थ पडला. यात त्याचा मृत्यू झाल्याचे समजले.

या धक्कादायक घटनेनंतर मृतक संतोष जगदाळे याच्या वडिलांनी ८ जुलै रोजी चिखली पोलिस ठाणे गाठून सगळी हकीकत सांगितली. यावरून, पोलिसांनी आरिफ खान रहिस, धीरज पंडितकर (रा. गजानन नगर चिखली) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. दोघेही संतोषच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भागवतकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT