son and father died due to corona in nagpur 
नागपूर

कोरोनामुळे अख्ख कुटुंब हादरलं, दोन तासाच्या अंतराने घेतला बाप-लेकाचा बळी

योगेश बरवड

नागपूर : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच कोरोनामुळे कुटुंबचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. शुक्रवारी कोरोनाने एकाच दिवशी २८ वर्षीय तरुण पूत्र आणि पित्याचा बळी घेतला. त्यामुळे मानेवाडा येथील पेंडलवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. 

दिवसेंदिवस कोरोना विक्राळरूप धारण करीत आहे. घरातील सदस्य एकाचवेळी कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. मानेवाडा भागातील रहिवासी कुटुंबावर कोरोनाने एकाच दिवशी दुहेरी आघात केला. पिता -पुत्रांचा कोरोनाने केवळ दोन तासांच्या अंतराने बळी घेतला. शाम श्रीधर पेंडलवार (२८) आणि श्रीधर गोविंदराव पेंडलवार (६७) अशी मृत पितापुत्राची नावे आहेत. पेंडलवार कुटुंब मानेवाड्यातील श्रीकृष्णनगरातील रहिवासी आहे. प्राप्त माहितीनुसार, पिता-पुत्र कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. शुक्रवारी सकाळी सर्वप्रथम मुलाची प्रकृती खालावली. श्वास घेणेही शक्य होत नसल्याने त्यांना तातडीने मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, तोवर बराच उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेनंतर केवळ दोन तासांच्या अंतराने सकाळी १० त्या सुमारास दडील श्रीधर यांनाही अस्वस्थ वाटू लागले. श्वास घेण्यात अडचण येत असल्याची तक्रार नोंदविताच त्यांनाही मेडिकलमध्ये हलविण्यात आले. पण, उपचारापूर्वीच त्यांचाही मृत्यू झाला. दोन्ही प्रकरणांमध्ये हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दुहेरी आघातामुळे पेंडलवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: साखर झोपेत असताना भयंकर घडलं! ठाण्यात २५ वर्षे जुन्या सदनिकेचा काही भाग कोसळून दुर्घटना; २ जखमी

Pune Crop Insurance: पुणे जिल्ह्यात सुमारे ८३,००० शेतकऱ्यांनी काढला पीक विमा; २३८ कोटी रुपयांचे मिळणार पीक विमा सुरक्षा कवच

‘मला वाटलं मी मरणारच…’ कॅन्सरच्या निदानानंतरची ती भयानक रात्र सांगताना मनीषा कोईराला भावुक, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : चाकणमध्ये ५ ते ७ किमी वाहनांच्या लांबच लांब रांगा! खड्ड्यांमुळे चाकण महामार्गावर अपघात; २ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू, दोघे गंभीर

पुण्यातील बुधवार पेठेत सपना बिल्डिंगमध्ये पोलिसांचा छापा... समोर जे दिसलं ते धक्कादायक, २ जणांना अटक

SCROLL FOR NEXT