school-sports- 
नागपूर

शालेय स्तरावर निर्माण होणार 'स्पोर्ट्स कल्चर'! कसे ते वाचा

नरेंद्र चोरे

नागपूर : केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणात क्रीडा व शारीरिक तंदुरुस्तीवर भर देण्यात आला असून, क्रीडा विषय अनिवार्य करण्यात आल्यामुळे शालेय स्तरावर 'स्पोर्ट्स कल्चर' तयार होईल, अशी आशा शहरातील क्रीडा संघटक व शारीरिक शिक्षकांनी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारने अलीकडेच वर्तमान शैक्षणिक धोरणात आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यात 'स्पोर्ट्स फॉर ऑल' ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपापल्या आवडीनुसार खेळांची निवड करून क्रीडा क्षेत्रात उंच झेप घेण्याची संधी मिळणार आहे. विकासाला चालना देणाऱ्या या धोरणाचे क्रीडा वर्तुळाकडून स्वागत करण्यात आले आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी म्हणाले, नव्या शैक्षणिक धोरणात फिटनेस आणि खेळांवर अधिकाधिक भर देण्यात आला आहे. त्यामुळे प्रचंड सकारात्मक बदल होणार आहे. यात क्रीडा हा विषय अनिवार्य करण्यात आला असून, 'स्पोर्ट्स फॉर ऑल' राहणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आवडीनुसार खेळ निवडून, त्यात करिअर करता येणार आहे. अभ्यासासोबतच खेळही खेळणार असल्याने विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास साधला जाणार आहे. त्यामुळे साहजिकच शाळा व महाविद्यालयांसह गावागावांमध्ये खेळाचे वातावरण तयार होण्याला मदत मिळणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, शारीरिक शिक्षकांना महत्त्व येऊन क्रीडा सुविधाही वाढणार आहे.

सोमलवार हायस्कूलमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शशिकांत चांदे यांनीही नव्या शैक्षणिक धोरणाचे स्वागत केले. ते म्हणाले, शैक्षणिक धोरणात आतापर्यंत शारीरिक शिक्षण हा दुर्लक्षित विषय राहिला आहे. मात्र नव्या धोरणात क्रीडाला झुकते माप देण्यात आल्याने भविष्यात मोठ्या प्रमाणावर युवा खेळाडू तयार होणार आहेत. पूर्वीच्या काळी मुले मैदानी खेळ खेळायचे. त्यामुळे त्यांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहायचे. मात्र आज घराघरांमधील मुले मोबाईल गेम्स, कार्टून, टिव्ही, इंटरनेटवेडे झाले आहेत. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे शैक्षणिक धोरणात बदल आवश्यक होता.

अभ्यासक्रमात खेळ अनिवार्य करण्यात येणार असल्यामुळे निश्चितच खूप फरक पडणार आहे. धोरण प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी आता शाळा व्यवस्थापन व प्रशासनावर राहणार आहे.

सविस्तर वाचा - गुंतागुंतीचे गर्भारपण, बेडरेस्ट व उपचार

सेंट मायकेल हायस्कूलचे क्रीडा शिक्षक स्टॅनली ग्रेगरी म्हणाले, युवा पिढीसाठी नवे शैक्षणिक धोरण खूप चांगले आहे. खरे तर ती काळाची गरजच होती. आतापर्यंत सीबीएसई शाळांमध्येच खेळांना महत्त्व दिले जात होते. मात्र आता स्टेट बोर्डातही खेळांचा जोमाने प्रचार व प्रसार होणार आहे. याचा लाभ हजारो विद्यार्थ्यांना होणार आहे. खेळ अनिवार्य करण्यात येणार असल्याने अधिकाधिक विद्यार्थी मैदानांवर दिसणार आहेत. त्यामुळे भविष्यात उदयोन्मुख खेळाडूंची फौज तयार व्हायला निश्चितच मदत होणार आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT