nagpur sakal
नागपूर

Nagpur:पूरग्रस्तांना राज्य शासनाची ८ कोटींची मदत

पुलाच्या पुनर्बांधकामासाठी ६ कोटी

सकाळ वृत्तसेवा

सप्टेंबरमध्ये अंबाझरी ओव्हर फ्लो झाल्याने नाग नदीला आलेल्या पुरात नागरिकांचे मोठे नुकसान झाले. याशिवाय नाग नदीची संरक्षक भिंत पडली, रस्तेही वाहून गेले. नाग नदीची संरक्षक भिंत, पूलाचे पुनर्बांधकाम, रस्ते दुरुस्तीसाठी राज्य सरकारने ८ कोटी ३८ लाख रुपये दिल्याची माहिती महसूल विभागाने दिली.

सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाला होता. त्यातील पाणी डागा ले-आऊट, अंबाझरी ले-आऊट, कार्पोरेशन कॉलनी, समता ले-आऊटमध्ये शिरले. या वस्त्यांमध्ये अक्षरशः सहा ते सात फुटापर्यंत पाणी साचल्याने नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.

अंबाझरी तलावातील पाण्‍याच्या प्रवाहाने नाग नदीच्या संरक्षक भिंती पडल्या. वस्त्यांतील रस्तेही वाहून गेले. राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने काल, पुलाचे पुनर्बांधकाम, रस्त्यांची दुरुस्ती, नुकसानग्रस्त घरांसाठी आर्थिक मदतीसाठी ८ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी दिला. डागा ले-आऊट, अंबाझरी ले-आऊट, कार्पोरेशन कॉलनी, समता ले-आऊटसह शहराच्या इतरही भागात पावसामुळे ड्रेनेज लाईनचे नुकसान झाले.

ड्रेनेज लाईन दुरुस्तीसाठीही हा निधी वापरण्यात येणार आहे. पुलाच्या पुनर्बांधकामासाठी राज्य सरकारने ६ कोटी दिले असून नाल्यांच्या बांधकामासाठी ९० लाख, ६१ किमी रस्त्‍यांच्या दुरुस्तीसाठी ६१ लाख ३८ हजार, नुकसानग्रस्त घरांना आर्थिक मदतीसाठी ८५ लाख ४४ हजार तर ड्रेनेज लाईन दुरुस्तीसाठी १ लाख ७२ हजार रुपये दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT