नागपूर

नागपूरचा पारा ४३ अंशांवर; उद्यापासून विदर्भात वादळी पावसाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विदर्भात (Vidarbha summer) नवतपाचा प्रभाव आता प्रकर्षाने जाणवू लागला आहे. शुक्रवारी नागपूरसह (Nagpur Temperature) जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमानाने जोरदार उसळी घेतली. नागपुरात आज या मोसमातील दुसऱ्या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. तर ब्रम्हपुरी (Vidarbha temperature update) येथे पारा ४४ अंशांवर गेला. विदर्भात सध्या उन्हाची लाट असली तरी, शनिवारपासून वादळी पाऊसही (Rain in Vidarbha) अपेक्षित आहे. तसा इशारा प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. (storming rain expected in Nagpur and Vidarbha from tomorrow)

बंगालच्या उपसागरातील 'यास' चक्रीवादळ थंडावल्यानंतर देशभरात उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. याचा सर्वाधिक प्रभाव सध्या विदर्भात दिसून येत आहे. राजस्थानकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे सरासरी तापमानात मोठी वाढ झाली आहे. नागपुरात शुक्रवारी पाऱ्याने ४३ अंशांवर झेप घेतली.

यंदाच्या मोसमातील हे दुसरे सर्वाधिक तापमान होते. गेल्या २८ मे रोजी पारा ४३.१ अंशांवर गेला होता. तर विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रम्हपुरी येथे ४४ अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली. याशिवाय वर्धा (४३ अंश सेल्सिअस), चंद्रपूर (४२.२ अंश सेल्सिअस), यवतमाळ (४२ अंश सेल्सिअस), अकोला (४१.९ अंश सेल्सिअस) व गोंदिया (४१.५ अंश सेल्सिअस) येथेही उन्हाचे जोरदार चटके जाणवले.

हवामान विभागानुसार, विदर्भात पुढील तीन-चार दिवस ऊन-पावसाचा खेळ सुरू राहणार आहे. दिवसभर उन्हाचे चटके बसेल. सायंकाळी मेघगर्जनेसह वादळी पाऊस बरसेल. दरम्यान, शेतकऱ्यांना उत्सुकता असलेल्या मॉन्सूनची वाटचाल योग्य दिशेने सुरू असून, सध्या पोषक वातावरण असल्यामुळे ३१ मेपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. केरळमध्ये आगमन झाल्यानंतर पंधरा दिवसांत विदर्भात धडकण्याची शक्यता आहे.

(storming rain expected in Nagpur and Vidarbha from tomorrow)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Pune Mega Plan : पुण्याचा २०३६ चा मेगा प्लॅन विकास आराखडा तयार : अर्थव्यवस्था २२० अब्ज डॉलर करण्याचे उद्दिष्ट

Solapur Farmer Loan Waiver : 59 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा; त्रुटी दूर, नवीन यादी लवकरच होणार जाहीर, आतापर्यंत 30 हजार 500 शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Election Symbol Controversy : निवडणूक आयोग एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून काम करत असेल तर आता काय उरते?; हायकोर्टाचा सवाल

SCROLL FOR NEXT