home-quarantine 
नागपूर

कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांचा घरवापसीचा मार्ग मोकळा!

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनामुळे सगळे अचानक थांबले. त्यामुळे वेगवेगळ्या कामांसाठी घरापासून दूर गेलेले अनेकजण बाहेरच अडकले. त्यांचे परतीचे मार्गच बंद झाले. अशा अनेकांमध्ये विदर्भातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. एक-दोन नव्हे तब्बल अठराशे विद्यार्थी कोटा येथे अडकले आहेत. लॉकडाऊनमुळे राजस्थानच्या कोटामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील सुमारे अठराशे विद्यार्थ्यांना परत घेऊन येण्याची तयारी सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना आणण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेस पाठविल्या जाणार आहेत. या संदर्भात राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातर्फे यासंदर्भातील सूचनाही निर्गमित केल्या असल्याची माहिती आहे.

14 दिवसांसाठी "होम क्वारंटाइन'
कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुढाकार घेतला असून यासाठी ते प्रयत्नरत आहेत. त्यांच्या आदेशानुसार राज्य नियंत्रण कक्षाने तयारी सुरू केल्याचे सांगितले जाते. प्राप्त माहितीनुसार विद्यार्थ्यांना आणण्यासाठी 91 बसेस पाठविण्यात येणार आहेत. विदर्भातूनही बसेस पाठविल्या जातील. अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वाशीम येथून 10 बसेस पाठवून त्यातून 190 विद्यार्थ्यांना परत आणले जाईल. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यातूनही बसेस पाठविण्यात येतील. त्यातून 256 विद्यार्थ्यांना आणण्याची तयारी आहे. विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणल्यानंतर चाचणी होईल. त्यानंतर 14 दिवसांसाठी "होम क्वारंटाइन' केले जाणार आहे.

सूचना मिळाल्या नव्हत्या
विभाग नियंत्रक कार्यालयाला मात्र अद्याप यासंदर्भातील सूचना मिळाल्या नव्हत्या. मध्यवर्ती कार्यालयाने सूचना देताच चालक, वाहकासह बसेस उपलब्ध करून देण्यास बांधील आहोत. त्यानुसार बसेस उपलब्ध करून दिल्या जातील, असे विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT