Jayanta meshram Sakal
नागपूर

माजी उपसरपंचाचा संशयास्पद मृत्यू; मृतदेह आढळला

दोन दिवसांपासून बेपत्ता होते

सतीश दहाट

कामठी (जि. नागपूर) - स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या दुर्गा सोसायटी न्यू येरखेडा रहिवासी भाजपचे पदाधिकारी व येरखेडा ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच ३१ मे च्या सकाळी नऊ वाजेपासून बेपत्ता होते. त्यांचा संशयास्पद स्थितीत चक्क मृतदेहच आढळल्याची घटना आज गुरूवार ता. २ रोजी सकाळी १० वाजता रणाळा रोड वरील नहराजवळील मोकळ्या जागेतील एका झाडाखाली निदर्शनास आली असून मृतक इसमाचे नाव जयंता यशवंत मेश्राम (४४) रा न्यू येरखेडा कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हे ३१ मे च्या सकाळी नऊ वाजेपासून घरून दुचाकी क्र एमएच ४० सी बी ००४२ ने घरी काही न सांगता निघून गेले मात्र बराच वेळ होऊनही घरी न परतल्याने घरमंडळींनी चिंता व्यक्त करीत नातेवाईकाकडे तसेच इतरत्र शोधाशोध करूनही कुठेही थांगपत्ता न लागल्याने मृतकाची पत्नी अन्नपूर्णा जयंता मेश्रामने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून मिसिंगची नोंद करून घेत पोलिसांनी तपासाला गती दिली.

मात्र दोन दिवस लोटूनही शोध लागला नव्हता मात्र सदर मिसिंग असलेल्या इसमाचा मृतदेहच एका झाडाखाली आढळल्याची माहिती नवीन कामठी पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

घटनास्थळी पोलिसांना मृतदेहाच्या पार्थिवाजवळ एक किटनाशक द्रव्यची बॉटल, एक बिअरची बॉटल तसेच मॅक्डोल नंबर वन कंपनीची विदेशी दारूची निप आढळली यावरून मृतकाने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या संशयास्पद स्थितीत मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवाला नंतरच स्पष्ट होईल. तूर्तास पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

सदर मृतक जयंता मेश्राम हे भाजपचे पदाधिकारी असून येरखेडा ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच होते. एक जवाबदार नागरिक म्हणून वावरत असताना त्यांच्या मनमिळावू स्वभाव शैलीतून त्यांनी सर्वांच्या मनात आपुलकीची जागा केली होती. मात्र या घटनेने सर्वांना एकच धक्का बसला असून कुठल्या मानसिक तणावातून ही घटना घडली हा चर्चेचा विषय असून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी मृताच्या मित्रमंडळी च्या वतीने करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT