ventilator bed
ventilator bed e-sakal
नागपूर

आतापर्यंत २५ शिक्षकांचा कोरोनाने मृत्यू, रुग्णालयात आरक्षित बेड देण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाच्या (coronavirus) वाढत्या संसर्गातही शिक्षक (teachers) विविध पातळीवर धडाडीने काम करताना दिसून येत आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्येही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे जवळपास आतापर्यंत २५ पेक्षा अधिक शिक्षकांचा मृत्यू (teacher death) झाला आहे. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या शिक्षकांना रुग्णालयात आरक्षित बेडची (reserve bed) सोय करण्याची मागणी आता शिक्षक संघटनांकडून (teacher organization) होताना दिसून येत आहे. (teacher organization demand to give reserved bed for corona infected teacher in hospital)

गेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढल्याने देशात टाळेबंदी करण्यात आली. यामुळे शिक्षकांची ड्यूटी जिल्ह्याच्या सीमेपासून तर धान्य वाटप केंद्र आणि कोरोनाच्या विलगीकरण केंद्रात लावण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबरला पुन्हा संसर्ग वाढल्याने शिक्षकांना कामास लावण्यात आले. आता गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. यामुळे पुन्हा एकदा शिक्षकांना चाचणी केंद्र, सर्व्हेक्षणासह लसीकरण आणि कोविड सेंटरवर तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरात कोरोनामुळे २५ पेक्षा अधिक शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय शेकडो शिक्षकांना कोरोनाची लागण झालेली आहे. विशेष म्हणजे ज्यांची प्रकृती गंभीर आहे, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात बेड मिळत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे उपचाराअभावी अनेक शिक्षकांच्या प्रकृती गंभीर झाल्यात.

प्रत्येकवेळी सरकारच्या योजना राबविणे आणि त्या योजनांचा प्रचार प्रसाराचे अशैक्षणिक काम शिक्षकांवर ढकलण्यात येते. मात्र, त्यांना उपचारासाठी साधा बेड उपलब्ध होत नसल्याने शिक्षकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे आता याविरोधात शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून शिक्षकांसाठी रुग्णालयात बेड आरक्षित करण्याची मागणी संघटनांकडून करण्यात आली आहे.

शिक्षकांची भूमिका -

गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येतात. त्यातूनच कोरोनाकाळात त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या. त्या जबाबदाऱ्या अतिशय चोखपणे सांभाळण्याचे काम ते करीत आहेत. रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ते विविध चाचणी केंद्र, लसीकरण केंद्रावर काम करताना दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांनाही फ्रंटलाईन वर्कर म्हणून योजनांचा लाभ आणि सुविधा पुरविणे गरजेचे आहे.

शिक्षकाचा वापर प्रत्येक कामासाठी सरकारकडून केल्या जातो. मात्र, जेव्हा त्यांच्या आरोग्याचा प्रश्न येतो, तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्या जाते. त्यामुळे कोरोनामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने अनेक शिक्षकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तेव्हा फ्रंटलाईन वर्कर म्हणून शिक्षकांनाही रुग्णालयात आरक्षित बेड देणे गरजेचे आहे.
प्रा. सपन नेहरोत्रा, शिक्षक भारती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT