Court sakal media
नागपूर

विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षे कारावास

उमरेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या युवकाला सत्र न्यायालयाने दहा वर्षे कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अल्केश बोरीकर (वय २८, रा. बुधवारी पेठ, ता. उमरेड) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात उमरेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी न्यायाधीश कैलाश राठी यांनी निर्णय दिला. अल्केश २५ जुलै २०१७ रोजी पिडीतेच्या शाळेमध्ये गेला. मुलीला मंदिरात नेतो अशी बतावणी त्याने शिक्षकांना केली. या बहाण्याने तो तिला लॉजवर घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला.

आरोपीने धमकी दिल्याने मुलगी घाबरली होती. शिक्षकांना अल्केशच्या वागण्यावर संशय आल्याने त्यांनी याची माहिती पालकांना दिली. त्यामुळे, त्यांनी मुलीकडे चौकशी केली असता हा प्रकार पुढे आला. त्यावरून पिडीतेच्या आईने अल्केश आणि त्याला मदत करणाऱ्या मित्राविरूद्ध पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली.

दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यावर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवीत त्याला शिक्षा सुनावली. शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील श्याम खुळे यांनी तर अॅड. अजय मदने यांनी आरोपीची बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : कोल्हापूरहून पुण्याला निघालेल्या खासगी बसला ट्रकची धडक; एकाचा मृत्यू, ५ जण जखमी

शालेय शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय! चौथी ते आठवीतील मुलींना आता स्वसंरक्षणाचे धडे; तायक्वांदो, कराटे, ज्यूदो, क्राव मागा, बॉक्सिंगचा समावेश, वाचा...

Pune News: स्पा सेंटरवर पोलीस छापा, घाबरून इमारतीवरून मारली उडी; तरुणीचा मृत्यू

Karad News: आयबी, एटीएसचे पथक कऱ्हाडमध्ये दाखल; बांगलादेशींकडे कसून चौकशी, संपर्कातील लोकांचीही झाडाझडती!

मोठी बातमी! ७/१२ उताऱ्यावरील पोटहिश्शाची मोजणी आता २०० रुपयांत; ‘या’ वेबसाईटवर करा ऑनलाईन अर्ज, ९० दिवसांत होईल मोजणी

SCROLL FOR NEXT