Nagpur Municipal Corporation esakal
नागपूर

ठाकरे समिती करणार स्टेशनरी घोटाळ्याची चौकशी

सभागृहातील महापौरांच्या आदेशाची अंमलबजावणी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महापालिकेतील स्टेशनरी व इतर साहित्य खरेदी घोटाळ्याच्या चौकशीसाठी महापौर दयाशंकर तिवारी(mayor dayashankar tiwari) यांनी सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत केली होती. या समितीवर प्रशासनाने आज शिक्कामोर्तब केले. त्यामुळे पुढील महिनाभरात ही समिती स्टेशनरी घोटाळ्यातील(Stationery scam ) वास्तव शोधून काढणार आहे. महापालिकेतील ६७ लाखांच्या स्टेशनरी घोटाळ्यावर विरोधी पक्षनेते तानाजी वनवे व माजी स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी घोटाळ्यावर चर्चेसाठी सभागृहात स्थगन प्रस्ताव दिला. यावर सभागृहात जोरदार चर्चा झाली.

ठाकरे समिती करणार चौकशी

मंजुरीसाठी तेरा दिवसांचा अवधी लागला. आज अविनाश ठाकरे (avinash thakrey)यांच्या अध्यक्षतेतील समितीवर प्रशासनावर शिक्कामोर्तब केले. या समितीत अध्यक्ष अविनाश ठाकरे यांच्याशिवाय विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, बसपाच्या नगरसेविका वैशाली नारनवरे, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी स्थायी समिती सभापती संदीप जाधव, स्थायी समितीचे सदस्य ॲड. संजय बालपांडे यांचा समावेश आहे. या घोटाळ्यात दोन मनपा कर्मचाऱ्यांसह पाच जण अटकेत आहे. या घोटाळ्याने महापालिकेतील आर्थिक अनियमतता चव्हाट्यावर आली.

ही समिती उद्यापासूनच कामकाज सुरू करणार आहे. या घोटाळ्यात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही विभागीय चौकशी सुरू आहे. ठाकरे समिती वास्तव शोधणार आहे. त्यामुळे आता या समितीच्या अहवालाकडे लक्ष लागले आहे. या समितीत निवृत्त न्यायाधीश, निवृत्त अंकेक्षकाची नियुक्ती करण्याचा अधिकारही महापौरांनी समितीला दिला आहे. त्यामुळे चौकशी समितीत निवृत्त न्यायाधीशाचा(retired judge) समावेश कधी होणार? याकडेही लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT