नागपूर

कॉंग्रेसला मंत्रिमंडळात दुय्यम स्थान केवळ प्रसारमाध्यमांमध्येच; आघाडीत सर्वाधिक लाभ

नीलेश डोये

नागपूर : महाविकासआघाडीच्या (Mahavikas Aghadi) मंत्रिमंडळात कॉंग्रेसच्या मंत्र्यांना दुय्यमस्थान केवळ प्रसारमाध्यमांमध्ये आहे. महाविकासआघाडीत सर्वाधिक लाभ कॉंग्रेसलाच (The biggest beneficiaries are the Congress) झाला. देश कॉंग्रेस मुक्त करण्याची भाषा करणाऱ्यांना महाराष्ट्रातून हद्दपार केले. ही कॉंग्रेसची मोठी उपलब्धी असल्याचे पशुसंवर्धन व क्रीडा मंत्री सुनील केदार (Animal Husbandry and Sports Minister Sunil Kedar) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगत भाजपाला टोला मारला. (The-BJP-used-the-language-of-liberating-the-Congress,-was-expelled-from-Maharashtra)

ग्रामीण भागातील सात प्राथमिक आरोग्य केंद्राला (पीएचसी) रुग्णवाहिका व पाच पंचायत समितीला चारचाकी वाहन हस्तांतरण सोहळा जिल्हा परिषद मुख्यालयात केदार यांच्या हस्ते झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कॉंग्रेसच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात दुय्यमस्थान केवळ प्रसारमाध्यमांमध्ये आहे. त्यांनी ते द्यावे हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला मानतो. कॉंग्रेस मुक्तची भारत करण्याची भाषा करणाऱ्यांना महाराष्ट्रातून हद्दपार केले. ही कॉंग्रेसची सर्वात मोठी उपलब्धी असून भाजपावर निशाना साधला.

सध्या शेतीचा हंगाम आहे. ग्रामीण भागातील अर्थचक्र शेतीवर आहे. आठ दिवसांत जिल्हा प्रशासन ग्रामीण भागातील कोरोना आटोक्यात आणेल. कोरोना काळात नागपूर जिल्हा परिषदेचे चांगले काम केले. रुग्णवाहिकेसाठी लोकांनी अधिकची रक्कम मोजावी लागली तर ती वेळेत न मिळाल्याने काहींचा मृत्यूही झाला. ही बाब लक्षात घेता जिल्हा परिषदेने स्वतः त्या खरेदी केल्या. ही कौतुकास्पद असल्याचे सुनील केदार यांनी सांगितले. यावेळी सभापती भारती पाटील, तापेश्वर वैद्य, उज्ज्वला बोढारे, नेमावली माटे, प्रकाश खापरे, दुधाराम सव्वालाखे, नाना कंभाले, शांता कुमरे आदी उपस्थित होते.

या पीएचसीला मिळाली रुग्णवाहिका

हिवरा बाजार (तालुका-रामटेक), मोहपा (तालुका-कळमेश्वर), खापा (तालुका-सावनेर), भुगावमेंढा (तालुका-कामठी), धानला (तालुका-मौदा), भिष्णूर (तालुका-नरखेड), सालई गोधनी (तालुका-नागपूर)

(The-BJP-used-the-language-of-liberating-the-Congress,-was-expelled-from-Maharashtra)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT