Yavatmal Crime  sakal
नागपूर

Yavatmal Crime : उमरखेड येथील युवकाचा मृत्यू संशयास्पद;अनाथ दत्ताच्या मारेकऱ्याला गजाआड करण्याची मागणी

शहरातील राजेंद्र प्रसाद वॉर्डमध्ये वास्तव्यास असलेला अनाथ युवक दीपक ऊर्फ दत्ता केशव चिंचलवाड (वय २३) याचा रविवारी (ता. पाच) सकाळी त्याच्या राहत्या घरी संशयास्पद मृतदेह आढळला.

सकाळ वृत्तसेवा

उमरखेड (जि. यवतमाळ) : शहरातील राजेंद्र प्रसाद वॉर्डमध्ये वास्तव्यास असलेला अनाथ युवक दीपक ऊर्फ दत्ता केशव चिंचलवाड (वय २३) याचा रविवारी (ता. पाच) सकाळी त्याच्या राहत्या घरी संशयास्पद मृतदेह आढळला. त्याचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना तातडीने गजाआड करण्याची मागणी शहरातील तरुणांनी ठाणेदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

दत्ता चिंचलवाड या युवकाला आईवडील नव्हते. तो घरी एकटाच राहत होता. ही घटना घडण्याआधी तो नांदेड येथे आत्याच्या घरी राहत होता. नांदेड महानगरपालिकेत तीन महिन्यांपासून नळाला पाणी सोडण्याचे काम करीत होता. ३० एप्रिल रोजी तो मित्राच्या लग्नाकरिता उमरखेडला आला.

५ मे रोजी सकाळी राहत्या घरी त्याचा मृतदेह रक्ताने माखल्या अवस्थेत संशयास्पद आढळून आला. त्यामुळे दत्ताचा खूनच झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा कसून तपास करावा म्हणून शहरातील युवकांनी पुढाकार घेत ठाणेदारांना निवेदन दिले. त्यात दत्ताच्या मृत्यूची कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

निवेदन देतेवेळी राहुल मोहितवार, अविनाश ढेंगळे, बालाजी कर्हाळे, ओमकार भागवत, दामोधर इंगोले, रवी थोरात, विनोद धोत्रे, सुनील भांडवले, श्रीधर इंगोले, प्रकाश वानखेडे, जय बनसोड, आकाश हिंगाडे, ईश्‍वर गोस्वामी, किरण कांबळे, नितीन लांबटिळे, डिगांबर जोगदंड, संतोष कोकाटे, राहुल लांबटिळे, सतीश पानपट्टे आदींची उपस्थिती होती.

दोन दिवसांपूर्वी वाद झाल्याची चर्चा

शहरातील बसस्थानक परिसरात दोन दिवसांपूर्वी दत्ताचा काही युवकांसोबत वाद झाल्याची चर्चा होती. नेमका वाद कुणासोबत व कशासाठी झाला याचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT