अत्याचार  Sakal
नागपूर

अत्याचार करून प्रेयसीचा खून

जंगलात घेऊन गेल्यानंतर पोटावर चाकूने वार

सकाळ वृत्तसेवा

मौदा (जि. नागपूर) - आंधळ्या प्रेमात स्वतःचे शरीर झोकून देणाऱ्या प्रेयसीचा प्रियकराने गळा आणि पोटावर चाकूने सपासप वार करून खून केला. तसेच खून करण्यापूर्वी तिच्यावर अत्याचार केला. धीरज सुरेश शेंडे (वय- १९, भामेवाडा, मौदा), असे नराधमाचे नाव असून त्याने फूस लावून बुधवारी (ता.२२) भामेवाड्याच्या जंगलात अल्पवयीन प्रेयसीला नेऊन खून केला.

आरोपी धीरज सुरेश शेंडे आणि दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. अधून-मधून ते एकांतात भेटत होते. घटनेच्या दिवशी मंगळवारी (ता.२१) शहरातील ट्यूशन क्लासला जाते म्हणत सकाळी साडेआठ वाजता अल्पवयीन मुलगी घरून निघून गेली. ट्यूशनवरून परत न आल्याने चिंतेत असलेल्या आईने याची माहिती मुलीच्या वडिलांना दिली. मैत्रिणीकडे गेली असेल म्हणून तिच्या मैत्रिणींना विचारणा करण्यात आली. मात्र, मैत्रिणींनी धीरज शेंडेसोबत दुचाकीवर बसून निघून गेल्याची माहिती दिली. आईवडिलांनी सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर धीरज आणि मुलगी सापडली नाही. त्यामुळे रात्री बाराच्या सुमारास मौदा पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेले. तेव्हा धीरज स्वतःच पोलिस ठाण्यात हजर असल्याचे दिसून आले. त्याने प्रेयसीचा खून केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धीरज आपल्या प्रेयसीला दुचाकीवर बसून कुही तालुक्यातील साळवा गावाच्या दिशेने नेले. भामेवाड्याच्या जंगलात नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. धीरज याने दुसऱ्यासोबत संबंध ठेऊ नको, म्हणून तिला धमकावले. तर मुलीने दुसऱ्यासोबत बोलणार असल्याचे सांगितले. यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात धीरज याने तिच्या गळ्यावर चाकूने वार केले. नंतर पोटावर सपासप वार केले. यात तिचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिचा मृतदेह भामेवाड्याच्या जंगलात फेकून दिला. रात्रीच धीरज मौदा पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने खून केल्याचा कबुली जबाब दिला.

याचदरम्यान मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यासाठी अल्पवयीन मुलीचे आईवडील पोलिस ठाण्यात गेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्पर पोलिस अधीक्षक राहुल माकनीकर, उपविभागीय पोलिस अधिकारी मुख्तार बागवान आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांच्या मार्गदर्शनात एपीआय सतीश सोनेकर, पीएसआय अरविंद मोहोड, ठाकूर, यंगलवार, संजय बरोदिया, प्रफल्ल रंधई, केशव फड यांनी केला.

अंधारात घटनास्थळ दिसलेच नाही!

धीरज रात्री बाराच्या सुमारास पोलिस ठाण्यात दाखल झाला. त्याने खून केल्याचा कबुली जबाब दिला. त्यानंतर पोलिस त्याला घटनास्थळाकडे घेऊन गेले. मात्र, अंधार असल्याने तो प्रेयसीचा मृतदेह लपवलेली जागा दाखवू शकला नाही. त्यामुळे पोलिस भामेवाड्याच्या जंगलातून परत आले. नंतर सकाळी त्याला घटनास्थळी घेऊन गेले.

प्रेमाच्या त्रिकोणाचा संशय

गेल्या सहा महिन्यापासून धीरज आणि अल्पवयीन मुलीचे प्रेमप्रकरण सुरू होते. तसेच ती मुलगी दुसऱ्या मुलासोबत नेहमी बोलत असे. यावरून त्यांचे भांडण झाले. दुसऱ्या मुलासोबत संबंध ठेऊ नको, असे धीरज याने तिला बजावले होते. मात्र, तिने दोघांसोबतही संबंध ठेवणार असल्याचे सांगितले. यावरून त्यांच्यात भांडण झाले. रागाच्या भरात धीरज मुलीचा खून केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT