File
File  Sakal
नागपूर

नागपूर विभागाचा निकाल ९७ टक्के

मंगेश गोमासे

नागपूर - राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे दहावीच्या निकालाची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. यामध्ये विभागाचा निकाल ९७ टक्के लागला. राज्यात विभाग चौथ्या स्थानावर असून विभागातील निकालात नागपूर जिल्ह्याने ९७.९३ टक्क्यासह प्रथम स्थान प्राप्त केले. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली असून ९८.१८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

दहावीच्या परीक्षेत १ लाख ५५ हजार ३६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ५३ हजार ७३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ४९ हजार १३३ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यामध्ये सर्वाधिक नागपूर जिल्ह्याने ९७.९३ टक्क्यासह प्रथम स्थान प्राप्त केले. दुसऱ्या स्थानावर भंडारा जिल्ह्याने ९७.२६ टक्के तर तिसऱ्या स्थानावर ९७.०७ टक्क्यासह गोंदिया जिल्हा आहे. गेल्यावर्षी वर्धा जिल्हा प्रथम स्थानावर होता.

विभागातही मुलीच अव्वल

बारावीप्रमाणे दहावीतही मुलींनी बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेत कमी संख्येने बसूनही जास्त टक्केवारीसह उत्तीर्ण झाल्या आहे. यामध्ये यावर्षी ७८ हजार ९८७ मुलांनी परीक्षा दिली. त्यापैकी ७५ हजार ७३९ मुले उत्तीर्ण झाल्यात. त्यांची टक्केवारी ९५.८८ इतकी आहे. याशिवाय दहावीची परीक्षा ७४ हजार ७५२ मुलींनी दिली. त्यापैकी ७३ हजार ३९४ मुली उत्तीर्ण झाल्यात. त्याची टक्केवारी ९८.१८ इतकी आहे.

विभागनिहाल निकाल

नागपूर - ९७.९३

भंडारा -९७.२६

गोंदिया - ९७.०७

वर्धा - ९६.२४

चंद्रपूर - ९५.९७

गडचिरोली - ९५.६२

मुला-मुलींची टक्केवारी

मुले- ७८,९८७ - ७५,७३९ - ९५.८८

मुली -७४, ७५२ -७३३९४ - ९८.१८

100 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नागपूर विभागाचा एकही विद्यार्थी नाही

100 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नागपूर विभागाच्या एकाही विद्यार्थ्याचा समावेश नाही. मात्र लातूर विभागात तब्बल 70 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळविले आहे. तर औरंगाबाद आणि कोल्हापूर विभागात 18-18 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळविले आहे. यानंतर आमरावती विभागात 8 विद्यार्थ्यांनी, पुणे विभागात 8 विद्यार्थ्यांनी, तर मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात प्रत्येकी एका विद्यार्थ्याने 100 टक्के गुण मिळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT