नागपूर

लोकशाहीच्या स्तंभाला मजबूत करण्यात वृत्तपत्र विक्रेत्यांचा वाटा

कर्नल राजावेलू : ‘दै. सकाळ’तर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या विक्रेत्यांनी वृत्तपत्र वाटपाचे काम केले, त्यांच्या पुढच्या पिढीतील या व्यवसायात असलेल्या विक्रेत्यांचा सन्मान ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करण्यात आला. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस. सकाळ माध्यम समूहाने ‘वृत्तपत्र विक्रेता दिवस’ म्हणून साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला होता. घरोघरी वृत्तपत्र टाकणाऱ्या महाराष्ट्रातील विक्रेत्यांचा सन्मान ‘सकाळ’तर्फे दरवर्षी केला जातो.

कोरोना संसर्गाच्या काळातही विक्रेत्यांनी वर्तमानपत्रे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अविरत काम केले. त्यांचे योगदान कौतुकास्पद आहे, त्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात ‘दै. सकाळ’चे कार्यकारी संपादक संदीप भारंबे यांनी ‘सकाळ’ची भूमिका विशद केली. प्रास्ताविक वरिष्ठ व्यवस्थापक विजय वरफडे यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन रूपेश मेश्राम यांनी केले. कार्यक्रमात ११० वर्षांपासून वृत्तपत्र वितरणाचे कार्य करणाऱ्या गाडगीळ परिवारातील श्रीधर गाडगीळ यांच्यासह ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते रमेश नागलकर, मुकुंद उल्ले, भोजराज उरकुडे, बाबाराव कुंडलकर, मुरलीधर दुबे, भारत बन्सोड, इंद्रपाल रामटेके, यशवंत ताजणे, अशोक वाटकर यांचा कर्नल राजावेलू यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

वृत्तपत्र विक्रेते स्वातंत्र्यपूर्व काळापासून समाजात योगदान देत आहेत. त्यांचे योगदान फार मोठे आहे. ‘दै. सकाळ’च्या या पावलामुळे त्यांच्या या योगदानाची जाणीव झाली. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून वृत्तपत्राची ओळख आहे. लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला मजबूत करण्याचे काम वृत्तपत्र विक्रेत्यांनी केले, अशा आधारस्तंभरूपी विक्रेत्यांचे कौतुक ‘सकाळ’ने केले, हे कौतुकास्पद आहे, अशी भावना कर्नल राजावेलू यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT