accident
accident esakal
नागपूर

ट्रेलरवर दुचाकी आदळून झालेल्या विचित्र अपघातात दोन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू; गावावर शोककळा

रुपेश नामदास

कारंजा (घाडगे): राष्ट्रीय महामार्गावर बेजबाबदारपणे मधोमध उभ्या असलेल्या ट्रेलरवर मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकी आदळली. यात दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले. हा अपघात गुरुवारी (ता. चार) पहाटेच्या सुमारास उघडकीस आला. चंद्रशेखर दिग्रसे व अंकुश ढोबाळे रा. सावळी (खुर्द) अशी मृतांची नावे आहेत.

चंद्रशेखर दिग्रसे व अंकुश ढोबाळे चंदेवाणी फाटा येथील कार्यक्रम आटोपून आपल्या एमएच ४० एए ४६०५ क्रमांकाच्या दुचाकीने गावाकडे परत येत होते. दरम्यान बोरी फाट्यानाजीक रस्त्याच्या मधोमध चालकाने बेजबाबदारपणे उभ्या करून ठेवलेल्या ट्रेलरवर मागाहून दुचाकी आदळली. यात दोघेही गतप्राण झाले.

अंकुश ढोबाळे हा कारंजा येथील फोटो स्टुडिओत काम करायचा. या अपघाताची माहिती महामार्गावरील आशीर्वाद हॉटेल येथे कामावर असलेले उमराव ढोबाळे यांना एका व्यक्तीने येऊन सांगताच त्यांनी घटनास्थळाला जाऊन पाहिले असता त्यांचा मुलगा अंकुश ढोबाळे हा रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे दिसून आले.

त्यांनी कारंजा पोलिस ठाणे गाठत अपघाताची माहिती दिली. कारंजा पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून तपास सुरू केला आहे. दोघांच्या मृत्यूची माहिती मिळताच गावावर शोककळी पसरली. आज दोघांवरही एकत्रीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील नागरिकांची उपस्थिती होती.

नादुरुस्त ट्रकला दुचाकीची धडक: चालक जागीच ठार

समुद्रपूर : येथील बॉयपास मार्गावर नादुरुस्त स्थितीत उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी आदळली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. विठ्ठल ईश्वर महातळे (वय ३९) रा. रासा (घोंसा) असे मृताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. चार) रात्रीच्या सुमारा घडली.

विठ्ठल महातळे हे त्यांच्या एम एच ३२ एन ३४४८ क्रमांकाच्या दुचाकीने हिंगणघाट येथे जात होते. दरम्यान बायपास मार्गावर उभ्या असलेल्या एम एच ३५ बि.जी.५२३८ क्रमांकाच्या ट्रकवर त्यांची दुचाकी आदळली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर येथील काही युवकांनी घटनास्थळ गाठत विठ्ठल महातळे यांना समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांनी ग्रामीण रुग्णालय गाठून महातळे कुटुंबीयांचे सांत्वन केले. गुरुवारी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.

विठ्ठल महातळे मुळचे रासा घोंसा येथील असून हिंगणघाट येथील संत ज्ञानेश्वर वॉर्डात राहुन पाणीपुरवठा पाइपलाइनचे कामे करीत होते. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी व आई असा आप्त परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT