corona_patient 
नागपूर

रमजानच्या पवित्र महिन्यात ते करताहेत कोरोना रुग्णांची सेवा

केवल जीवनतारे @kewalsakal

नागपूर : रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. महिनाभरापासून मुस्लिम बांधव रोजे ठेवत आहेत. रमजानच्या उपवासाच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांचा दिनक्रम पहाटे चार वाजतापासूनच सुरू होतो. कोरोनाच्या या महासंकटातही ही दैनंदिन जीवनशैली शाबूत ठेवत रुग्णालयातील डॉक्‍टर, परिचारिकांसह इतरही मुस्लिम कर्मचारी सेवादूत म्हणून कर्तव्यावर आहेत. कोविड रुग्णालयासह इतरही वॉर्डात मुस्लिम कर्मचारी रमजानच्या महिन्यात आईपेक्षाही वत्सलेने रुग्णांची सेवा  करीत आहेत. कडकडीत उपवास करतानाच रुग्णालयात प्रत्येक दिवस युद्धजन्य परिस्थितीत सेवा देत आहेत. खऱ्या अर्थाने हे कोरोना योद्धे आहेत. त्यांच्यासाठी रुग्णसेवा हीच अल्लाची सेवा ठरली आहे.
आपल्या कर्माचा, कर्तव्याचा जवाब अल्लाला द्यायचा आहे. रमजान-उल-मुबारक कर्म करताना मनुष्याला आपल्या अल्लाप्रति अर्थात ईश्वराप्रती सदाचारी व प्रामाणिक राहण्याचा संदेश म्हणजे रमजानचा हा महिना. रमजानचा हा पवित्र महिना प्रामणिकतेची शिकवण देतो. भुकेलेल्यांची भुक, तहानलेल्यांची तहान भागविणे, रंजल्या गांजल्या रुग्णांची सेवा करण्याचा मानवता धर्म पाळण्याचा संदेश रमजान देतो. रमजानमध्ये मनुष्य नमाज पठण आणि अल्लाच्या प्रेमात दंग झालेला असतो. रोजामुळे मनाला लाभलेले "आत्मबळ ' ते रुग्ण सेवेत खर्च करीत आहेत. कुराण-ए-मजिदमधील एकूण 144 सुरा म्हणजे भाग सांगितले आहेत, त्यातील दुसऱ्या भागातील 183 आयतमध्ये लिहिले आहे की तुम्ही अल्लामय बनण्यासाठी रोजे ठेवा, कमीत कमी तसा प्रयत्न तरी करा. रुग्णसेवेचे हे व्रत मुस्लिम परिचारिका,कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या संकटकाळात जपले. एकीकडे रमजानचे रोजे सुरू आहेत, तर मेडिकल-मेयोमधील कोविड हॉस्पिटलसह इतरही रुग्णांच्या सेवेत मुस्लिम परिचारिका, तंत्रज्ञ मोठ्या संख्येने कोरोना योद्ध्याची भूमिका बजावत आहेत. त्यांच्यासाठी रोजे महत्त्वाचे असले तरी रुग्णसेवाही तितकीच प्राधान्याची आहे. मेडिकलच्या कोविड वॉर्डात सेवा देणारे शहजाद बाबा खान ब्रदर (मेल नर्स) म्हणून काम करीत आहेत. पीपीई कीटमध्ये असताना त्यांना पाणीही पिता येत नाही. उपवासकाळात कोरोनाची खिंड लढवणारे शहजाद बाबा खान यांचा दररोज कोरोनाबाधितांशी थेट संपर्क येतो. विशेष असे की, बाबा खान वॉर्डात कोरोनाबाधित मुस्लिमांशी त्यांच्याच भाषेत संवाद साधतो. कोरोना या आजारासंदर्भात माहिती सांगतो. कोरोना रुग्णांना धर्म नाही, रुग्ण हा केवळ रुग्ण असतो, त्यांची सेवा करणे हाच रमजान महिन्यातील मुख्य उद्देश बाबा खान सांगतात. बाबा खान यांच्यासह मेडिकलमध्ये जुल्फीकार अली, अमीन मन्नान अली, शोएब खान, तबस्सूम निशा शेख, शबाना सईद, तरन्नुम बेगम, झरिना बानू, अब्बास अली, गुलफाम हसन तर मेयो रुग्णालयातील शाहिदा पठाण, फरहात हैदर, शारिब हैदर,नाझनीन अंसारी, रुहेना, शमिमा खान, हर्षना अंसारी इत्यादी कर्मचारी रोजा सांभाळात रुग्णालयात सेवाधर्माचे कर्तव्य पार पाडत आहेत. रुग्णालयात काम करीत असल्याने घरात प्रवेशापूर्वी पुन्हा अंघोळ अपरिहार्य ठरते. रात्रपाळीच्या कर्मचाऱ्यांनाही मोठी कसरत करावी लागते. या सगळ्‌या कसरतीनंतरही रुग्णसेवेत खंड पडू न देणारे हे रुग्णसेवेतील वारियर्स आहेत.
रुग्णसेवेतील हे योद्धे
एवढ्या उन्हात अन्न नाही मिळाले तरी चालते मात्र पाण्याशिवाय जीव तडफडतो, तरीही रुग्णसेवेतील हे योद्धे आपल्या श्रद्धेत खंड पडू न देता नेहमीसारखेच रुग्णसेवेचा धर्म निभावत असतात. यांच्यासाठी ही अल्लाहतालाचीच मर्जी असे म्हणावे लागेल. परिचरिका वर्ग उपवासाचे पावित्र्य जपत कोविड वॉर्ड तसेच इतरही वॉर्डात सेवा देताना संघर्ष करीत आहे. यांची जबाबदारी रुग्णसेवेत तितकीच मोलाची ठरत असल्याचे मेडिकलच्या परिचर्या अधिक्षक मालती डोंगरे म्हणाल्या.
रुग्णसेवा महत्त्वाची
परिचर्या व्यवसायातील कर्तव्य सुरू झाले की रुग्णसेवेशिवाय अन्य कशालाही प्राधान्य नाही. कोविड हॉस्पिटलमध्ये सेवा देताना डॉक्‍टरांसह परिचारिका व इतर सर्वांचीच जबाबदारी असते. इतरवेळी सेवा सुरू असतेच, परंतु रमजानच्या काळातही अखंड सेवा सुरू आहे. कोरोनाच्या रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानंतर बाहेर पडलेल्या रुग्णाच्या डोळ्यातील आनंदामुळे उपवासाचे पुण्यकर्म प्राप्त झाल्याचे समाधान मिळते.
शहजाद बाबा खान, सचिव, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, नागपूर शाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT