crime  sakal
नागपूर

Nagpur News : न्यायाच्या मागणीसाठी कैदी चढला झाडावर, तब्बल दोन तास पोलिस प्रशासन वेठीस

आत्महत्येची धमकी

सकाळ वृत्तसेवा

भंडारा - नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका अंडर ट्रायल कैद्याने जिल्हा कारागृह व पोलिस प्रशासनाला तब्बल दोन तास वेठीस धरले. या कैद्याने कारागृहाच्या आवारातील एका पिंपळाच्या झाडावर चढून उडी घेऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली.

कारागृह प्रशासनाने त्याला खाली उतरविण्यासाठी केलेले प्रयत्न फोल ठरले. शेवटी पोलिस उप अधीक्षक अशोक बागुल यांनी समुपदेशन कौशल्याचा वापर करून या कैद्याला आत्महत्येपासून परावृत्त करून त्याचे प्राण वाचविले. दोन दिवसांपूर्वीची घटना आज, शनिवारी उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

खैरलांजी या गावातील एका खून प्रकरणात लिल्हारे नामक एक अंडर ट्रायल कैदी तीन ते चार वर्षांपासून जिल्हा कारागृहात आहे. ज्या प्रकरणात तो कारागृहात आहे, ते प्रकरण न्यायप्रविष्ट असून लवकरात लवकर त्याचा निकाल लागावा असे त्याला वाटू लागले. मात्र, ‘तारीख पे तारीख’ मुळे हळूहळू त्याला नैराश्य येऊ लागले.

त्यातून आत्महत्येचा विचार त्याच्या मनात डोकावल्याचे सूत्रांनी सांगितले. ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी हा कैदी आवारातील एका पिंपळाच्या झाडावर चढला आणि झाडावरून ‘मला लवकरात लवकर न्याय मिळाला नाही, तर मी झाडावरून उडी घेऊन आत्महत्या करणार’ अशी धमकी देवू लागला. कैद्याला झाडावरून खाली उतरविण्यासाठी नानाविध युक्त्या करण्यात आल्या.

मात्र, कुणावर विश्वास नसल्याचे सांगून त्याने झाडावरून खाली येण्यास नकार दिला. अशातच दीड ते दोन तास गेले. जिल्हा कारागृहाचे अधीक्षक, भंडारा पोलिस ठाण्याचे ठाणेदार, नगर पालिकेचे मुख्याधिकारी सर्वांनी या कैद्याला समजावण्याचा प्रयत्न केला.अखेर पोलिस उपअधीक्षक अशोक बागुल यांनी झाडावर चढलेल्या कैद्याची समजूत काढण्यास सुरवात केली.

त्याच्या जिवाचे मोल असल्याचे त्याला पटवून देत त्याचे मनोबल वाढविले. अखेर बागुल यांच्या शब्दावर विश्वास ठेवून हा कैदी झाडावरून खाली उतरला.

तो सुखरूप खाली उतरताच बागुल यांनी त्याला प्रेमाने जवळ घेऊन पुन्हा असे कोणतेही टोकाचे पाऊल न उचलण्याचे वचन त्याच्याकडून घेतले. सुमारे एक वर्षभरापूर्वीही जिल्हा कारागृहात अशाच प्रकारे एका कैद्याने कारागृहाच्या आवारातील पिंपळाच्या झाडावर चढून आत्महत्या करण्याची धमकी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup Contamination : ...तर वाचला असता निष्पाप बालकांचा जीव; कफ सिरप कंपनीने केले ३५० बाबींचे उल्लंघन, अहवालात धक्कादायक माहिती समोर

Navid Mushrif Vs Shoumika Mahadik : गोकूळ दूध संघाकडून ऐन निवडणुकीच्या तोंडावर गंडवा गंडवीची चलाखी, प्रकरण अंगलट येणार?

Flight Ticket Price Hike: प्रवाशांच्या खिशाला फटका! दिवाळीपूर्वी रस्तेसह हवाई वाहतूक सेवा महागली; काय आहेत दर?

ऑनलाइन गेममध्ये ५० लाख गेले, दागिने चोरताना पाहिल्यानं आईला लेकानेच संपवलं; स्क्रू ड्रायव्हरने गळ्यावर वार

Panic & Heart Attack Difference: हार्ट अटॅकची लक्षणे 'दिसतात' पॅनिक अटॅकसारखीच! डॉक्टरांनी सांगितली फरक ओळखण्याची सोपी ट्रिक

SCROLL FOR NEXT