Pench Tiger Reserve 
नागपूर

Pench Tiger Reserve : पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाची शिकार

तीन आरोपींना अटक : अवयवाची विल्हेवाट

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या नागलवाडी वन परिक्षेत्रामध्ये वाघाची शिकार झाल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तिघांनाही वन कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपासासाठी वाघाच्या अवयवाचे नमुने फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात येणार आहे.

नागलवाडी वन परिक्षेत्राचे क्षेत्र अधिकारी प्रवीण लेले यांना वाघाची शिकार झाली असून त्याच्या शरीराच्या अवयवांची विल्हेवाट लावण्यात येत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार नागलवाडी परिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या सुरेवाणी तलावाच्या संपूर्ण परिसराची झाडाझडती घेतली. दरम्यान, पथकाला वाघाचे कुजलेल्या अवस्थेतील पंजे आणि शरीराचे इतर अवशेष सापडले. याप्रकरणी सुरेवाणी गावातून तीन आरोपींना ताब्यात घेतले. तिघांनाही न्यायालयात हजर केले असता वन कोठडी देण्यात आली आहे. वाघाचे फॉरेन्सिक नमुने गोळा करण्यात आलेले आहे. त्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मदत केली.

पेंच प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक ए. श्रीलक्ष्मी, उपसंचालक प्रभुनाथ शुक्ला, सहाय्यक वनसंरक्षक (पश्चिम पेंच) किरण पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी खापा (प्रादेशिक) सचिन आठवले, पी. एस. खंदारे आणि वन परिक्षेत्र अधिकारी सुदर्शन भट यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदनानंतर वाघाला जाळण्यात आले.

एनटीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार डॉ. सुजित कोलंगट, डॉ. मयूर पावशे यांनी मानद वन्यजीव रक्षक अजिंक्य भाटकर आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी म्हणून मंदार पिंगळे, उधमसिंग यादव यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी डॉ. अमित लोहकरे, डॉ गौरव बारस्कर, डॉ सुदर्शन काकडे, डॉ पंकज थोरात, डॉ हर्षिता राघव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांवर काही ठिकाणी वाहतूक मंदावली, नागरिकांची तारांबळ

हॅप्पी दिवाळी! दिपिका-रणवीरने लेक 'दुआ'सोबत पहिल्यांदाच शेअर केला फोटो....

शेवटच्या ओव्हरमध्ये ४ धावा अन् सामना टाय... BAN vs WI सामन्यात ड्रामा; थरारक सुपर ओव्हरमध्ये लागला निकाल

Deglur ZP Elections : ग्रामीण भागात मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची धामधूम; शेतकऱ्यांच्या प्रश्नांना बगल

PESA Candidates Disqualification : पेसा भरतीतील २३ उमेदवारांचे भवितव्य धोक्यात; दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कागदपत्रांची पूर्तता कशी करणार?

SCROLL FOR NEXT