balasaheb thackeray gorewada international zoological park Sakal
नागपूर

पर्यटकांच्या गर्दीने फुलले गोरेवाडा; वेळेवर दोन बसची सोय

दिवाळीचा उत्साह व सलग लागून आलेल्या सुट्यांमुळे पर्यटकांनी आज गोरेवाड्यातील बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणिउद्यानात गर्दी केली. सकाळपासूनच सफारीसाठी रांगा लागलेल्या दिसून आल्या.

राजेश रामपूरकर

नागपूर - दिवाळीचा उत्साह व सलग लागून आलेल्या सुट्यांमुळे पर्यटकांनी आज गोरेवाड्यातील बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणिउद्यानात गर्दी केली. सकाळपासूनच सफारीसाठी रांगा लागलेल्या दिसून आल्या. पर्यटकांची गर्दी पाहता व्यवस्थापनाला वेळेवर दोन अतिरिक्त बसची सोय करावी लागली.

गुरुवारी लक्ष्मीपूजनानंतर शुक्रवार, शनिवार, रविवार या सलग सुट्या लागून आल्याने यंदा सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह आहे. अनेकांनी दिवाळीला लागून आलेल्या सुट्यांचे नियोजन केले. त्यातच शहराबाहेर नोकरी करीत असलेले अधिकारी, कर्मचारीही घरी परतले. तीन सुट्या असल्याने यातील अनेकांनी बाहेर जाण्याऐवजी शहरात कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण घालविण्याचे नियोजन केले.

शहराला लागून असलेल्या गोरेवाडा येथील बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणिउद्यानात सफारीचा आनंद लुटण्याचाही बेत अनेकांनी आखला. गुरुवार, शुक्रवारी दिवाळीचा आनंद लुटल्यानंतर अनेकांचा मोर्चा गोरेवाड्याकडे वळला. आज सकाळी आठ वाजतापासूनच गोरेवाडा प्राणी उद्यानात गर्दी दिसून आली. त्यानंतर ही गर्दी वाढत गेली. पर्यटकांना सफारीसाठी गोरेवाडा प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने पाच बसची सोय केली.

परंतु ही सुविधाही कमी पडू लागली. त्यामुळे दोन अतिरिक्त बसची सोय व्यवस्थापनाला करावी लागली. कुटुंबीयांसोबत जंगल सफारीचा शहराजवळच आनंद लुटता येत असल्याने पर्यटकांनी चांगलीच गर्दी केली. त्यामुळे व्यवस्थापनाचीही वेळेवर धावपळ झाली. सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत सफारीसाठी नोंदणी करण्यात आली होती.

त्यामुळे दिवसभरच गोरेवाडा गर्दीने फुलला होता. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात अनेकांनी भीतीने गोरेवाडा टाळले. परंतु कोरोना बाधितांच्या संख्येत झालेली घट, बहुसंख्य नागरिकांनी घेतलेली लस आदी बघता गोरेवाड्यात आता गर्दी वाढत आहे. रविवार असल्याने गोरेवाडा उद्याही ‘हाऊसफुल्ल’ राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke: सरकारी शाळांसाठी किती निधी? किती पदे रिक्त? अभिजीत दीपकेंनी शिक्षण मंत्र्यांना विचारले ६ सवाल, माहिती देण्याचे आवाहन

रेल्वेच्या चादरी घेऊन बाजारात फिरले अन् कॅमेऱ्यात कैद झाले; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केली कारवाईची मागणी

IND vs SL 2nd Test: ध्रुव जुरेलची शतकी खेळी! भारताची पाचशे धावांच्या दिशेने वाटचाल; हार्दिक पांड्यानंतर असा पराक्रम करणारा पहिला

Marathi News Live Updates : परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी रशियातील मॉस्को येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली

झी मराठीवर येतेय नवी मालिका ‘धाकट्या सूनबाई’! प्रेमाची नवी गोष्ट लवकरच, कोण आहे नायिका?

SCROLL FOR NEXT