transformers
transformers Sakal
नागपूर

रामदासपेठेतील डीपीला आग

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - रामदासपेठेतील सेंट्रल रोड मार्गावरील मृण्मय प्लाझा बिल्डिंग जवळील महावितरणच्या ११ केव्ही रिंगमेन युनिटच्या केबलला (डीपी) दुपारी चार वाजताच्या अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पोचून वीज पुरवठा खंडित केला. अग्निशमन दलाच्या साहाय्याने ही आग विझविण्यात आली.

रामदासपेठ भागातील ११ केव्ही रिंगमेन युनिटच्या केबलला दुपारी चार वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे परिसरातील वीज गेली. काही वेळातच त्या परिसरातील डीपीने पेट घेतला. आगीचे लोळ बाहेर निघत होते. तातडीने त्या परिसरातील वाहने हटविण्यात आली. माहिती मिळताच महावितरणची चमू घटनास्थळी पोचली. विजपुरवठा बंद करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग मोठी असल्याने परिसरातील नागरिकांनी मनपाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून बोलविण्यात आले. त्यानंतर ही आग आटोक्यात आली.

दरम्यान, आग विझली की नाही हे पाहण्यासाठी त्या डीपीच्या चाव्या नसल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी काही भाग तोडला आणि आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी स्फोट झाल्याने चांगलीच तारांबळ उडाली. आग विझविण्यासाठी तब्बल एक तास लागला. आगीमुळे प्रभावित ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणने तातडीने सुरु केला. मात्र, महावितरणचे अधिकारी या घटनेच्या वेळेस अनुपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT