Hingna Drowning Case 
नागपूर

Hingna Drowning Case : दसऱ्याच्या दिवशी तलावात बुडाली दोन मुले

Hingna Drowning Case : दसऱ्याच्या सुट्टीत फिरायला गेलेल्या नागपूरच्या दोन मुलांचा मोहगाव झिल्पी तलावात बुडून मृत्यू झाला. मित्रांसह पोहायला गेलेल्या विरसेन गजभिये आणि गौरव बुरडे यांची ही दुर्दैवी घटना आहे.

सकाळ वृत्तसेवा

हिंगणा : दसऱ्याची सुटी असल्याने फिरायला गेलेल्या दिघोरीतील दोन मुलांचा मोहगाव झिल्पी तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी ( ता.१२) सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली. विरसेन विठोबा गजभिये (वय १५, शिवसुंदरनगर दिघोरी, नागपूर) व गौरव लीलाधर बुरडे (वय१५, रमणा मारोती, नागपूर) अशी मृतांची नावे आहेत.

दिघोरी व खरबी परिसरातील १३ ते १५ वर्षे वयोगटातील वेगवेगळ्या शाळेतील ९ मुले दसऱ्याची सुट्टी असल्याने दुचाकीने फिरायला मोहगावात गेले होते.दिघोरी व खरबी परिसरातील मित्र गौरव व विरसेनसह लव डांगे, गौरव चंचाने, नैतिक शिगंनजुने, तादिल शेख, फैय्याज अन्सारी व आणखी दोघे हे मित्र शनिवारी सकाळी दुचाकीने मोहगाव झिल्पी तलावाकडे फिरायला गेले. विरसेन व गौरवने तलावात पोहण्याची इच्छा व्यक्त करताच

दसऱ्याच्या दिवशी तलावात बुडाली दोन मुले

दोघे जण आधीच घराकडे परतले. काही वेळानंतर विरसेन व गौरव पोहण्यासाठी तलावात उतरले. इतर ५ जण नकार देऊन काठावर असलेल्या एका झाडाखाली गप्पा करीत बसले होते. तलावात काही दूर गेल्यावर दोघेही दिसेनासे झाले. यामुळे झाडाखाली बसलेल्या मित्रांनी आरडाओरड सुरू केली. परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी धाव घेतली. मात्र दोघेही पाण्यात बुडाल्याचे लक्षात येताच दुकानदारांनी घटनेची माहिती सरपंच प्रमोद डाखळे यांना दिली. त्यांनी हिंगणा पोलिसांना कळविले.

त्यानंतर ठाणेदार जितेंद्र बोबडे, हवालदार नागेश दासरवार, अरविंद नाईक, संदीप येवले, संजीव तायडे घटनास्थळी दाखल झाले. रामदास मोरे व पिंटू बावने यांनी दुपारी १ वाजता दोन्ही मुलांचे मृतदेह तलावातून बाहेर काढले. नातेवाईकांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. मुलांचे मृतदेह पाहून त्यांचा अश्रूंचा बांध फुटला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT