Two wheeler taxi brings jobs in country said Nitin gadkari
Two wheeler taxi brings jobs in country said Nitin gadkari  
नागपूर

‘टू व्हिलर टॅक्सी’ रोजगार निर्मितीची नवीन वाट; नितीन गडकरी यांचे प्रतिपादन  

राजेश चरपे

नागपूर ः कोरोनामुळे सर्वच औद्योगिक व अन्य क्षेत्रांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले. अशा स्थितीतही ऑटोमोबाईल क्षेत्राने चांगली कामगिरी केली, ही आनंदाची बाब आहे. आगामी काळात ‘टू व्हिलर टॅक्सी’ संकल्पना रोजगार निर्मितीची नवीन वाट ठरेल, असा विश्वास केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

एफएडीए गव्हर्निंग कौन्सिल सदस्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ना. गडकरी यांनी संवाद साधला. कार्यक्रमात बोलतान ते पुढे म्हणाले, टू व्हिलर टॅक्सीला इलेक्ट्रॉनिक मीटर लावून टॅक्सी म्हणून चालविण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे कुणालाही पैसा कमावता येणार आहे. एकट्या व्यक्तीला बस, रेल्वे स्टेशनवर पोहोचवाचे असल्यास ही टॅक्सी सुविधा अत्यंत फायदेशीर ठरेल. टॅक्सी चालकाला रोजगार आणि प्रवाशाला स्वस्तात आपल्या गंतव्यापर्यंत पोहोचता येणार आहे.

भारतात सार्वजनिक वाहतूक अपेक्षेइतकी यशस्वी झाली नाही. काही भागात यशस्वी झाली. पण ती डिझेलमुळे परवडत नाही, असे सांगताना गडकरी म्हणाले, सार्वजनिक वाहतुकीसाठ़ी जैविक इंधन- इथेनॉल, मिथेनॉल, सीएनजी, बायो सीएनजीचा वापरच अधिक फायदेशीर ठरणार आहे. याशिवाय ट्रॉली बसेसचा वापर केला तर कमी खर्चात प्रवास शक्य आहे. इलेक्ट्रिक इंधन अत्यंत स्वस्त पडणारे आहे. डिझेल आणि पेट्रोलसाठ़ी आज जैविक इंधनाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

जवळपासच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी ना. गडकरी यांनी ब्रॉड गेज मेट्रोचा पर्याय समोर आणताना सांगितले की, हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या परवडणारा आहे. केवळ पाच कोटी रुपये प्रति किलोमीटर खर्च या प्रकल्पाला येणार आहे. रेल्वेच्याच सुविधा वापरून नागपूर, अमरावती, नरखेड, वडसा, गोंदिया, रामटेक, छिंदवाडा अशा ठिकाणी ब्रॉडगेज मेट्रोतून प्रवास करता येईल. १६० किमी प्रतितास आणि एसीची सुविधा असलेली मेट्रो जनतेला प्रवासासाठी यशस्वी ठरेल,असे गडकरी म्हणाले.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून; नेमकं काय घडलं? मृतदेह स्वीकारण्यास पत्नीचा का नकार?

SCROLL FOR NEXT