police 
नागपूर

बंदोबस्ताच्या ठिकाणी तैनात असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची पकडली कॉलर... मग

सकाळवृत्तसेवा

नागपूर : कोरोना आजाराशी लढण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आला आहे. लॉकडाउनची तंतोतंत अंमलबजावणी करण्याची जबाबदारी साहजीकच पोलिस विभागावर आली आहेत. सामान्य नागरिकांचा जीव सुरक्षित राहावा म्हणून ते दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. सामान्यांच्या सुरक्षेसासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकण्यासाठी ते मागे हटत नाहीच. तरीदेखील काही आगाऊ लोक त्यांना सहकार्य करण्याऐवजी त्यांच्याशी वाद घालत आहेत. काही जण तर त्यांच्यावर हात उगारण्यास देखील विचार करत नाहीत. अशीत एक दुर्दैवी घटना नागपूरच्या कामठी परिसरात घडली.

लॉकडाऊनचे उल्लंघन करून बाहेर फिरणाऱ्या दोन भावंडावर कारवाई केल्यामुळे चिडलेल्या आरोपींनी पोलिस उपनिरीक्षकाला जबर मारहाण केली. ही घटना नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास घडली. कैलास रामराव मुळे (32) आणि राकेश रामराव मुळे (30) रा. दुर्गा सोसायटी, कामठी असे आरोपी भावंडांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन कामठी पोलिस ठाण्यात नेमणुकीवर असलेले पोलिस उपनिरीक्षक धोंगडे (39) हे न्यू येरखेडा, दुर्गा सोसायटी चौकात शनिवारी सायंकाळी लॉकडाऊन बाबत कर्तव्य बजावत होते. दरम्यान कैलास आणि राकेश हे चौकात आले. त्यांनी संचारबंदी आणि लॉकडाऊनचे उल्लंघन केले. त्यामुळे कर्तव्यावर असलेले पीएसआय आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत चौकशी केली असता दोन्ही भावंडांनी पीएसआय धोंगडे यांची कॉलर पकडून जबर मारहाण केली. पोलिसांनी अतिरिक्‍त स्टाफ बोलावला. दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तसेच विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून दोन्ही भावंडांना अटक केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Messi in Vantara: मेस्सीची माधुरी हत्तीणीसोबत भेट? पिल्लांसोबत खेळला फुटबॉल... वनतारा’ मध्ये काय घडलं?

प्रसिद्ध युट्यूबरचा 1.20 मिनिटाचा MMS लीक? व्हायरल व्हिडिओची पोलखल: सत्य समोर

Latest Marathi News Live Update : लातुरात काँग्रेसच्या माजी महापौर आणि माजी नगरसेवकांचा भाजप प्रवेश

IPL 2026 Auction : रिषभ पंतच्या संघाकडून मोठी चूक; ४ सामन्यांसाठी मोजले ८.६० कोटी; कॅमेरून ग्रीनपेक्षा 'या' खेळाडूचा झालाय फायदा

ठाकरे बंधू दाखवणार ताकद! युतीबाबत संजय राऊतांनी दिली मोठी माहिती, घोषणेची वेळ ठरली

SCROLL FOR NEXT