Two youths drown in Wardha river Hinganghat sakal
नागपूर

वर्धा नदीत बुडून २ युवकांचा मृत्यू

हिवरा येथील घटना पोहण्यासाठी उतरले होते पाण्यात

सकाळ वृत्तसेवा

वडनेर : हिंगणघाट तालुक्यातील हिवरा येथील वर्धा नदीत पोहण्यासाठी गेलेले चार युवक पाण्यात बुडाले. त्यांपैकी दोघांना वाचविण्यात नागरिकांना यश आले, दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. ही धक्कादायक घटना आज रविवारी (ता. सहा) सायंकाळच्या सुमारास घडली. आज दुपारच्या सुमारास दुचाकीने आजनसरा येथून पिपरी येथील ऋतिक नरेश पोखळे (वय‌ २१), संघर्ष चंदुजी लढे (वय १८), रणजित रामजी धाबर्डे (वय २८) आणि शुभम सुधाकर लढे (वय २६) हे चार मित्र हिवरा येथील वर्धा नदीत पोहायला गेले.

या चौघांना नदीतील पाण्याचा अंदाज आला नसल्याने चार युवक नदीत बुडू लागले. घटनेच्या वेळी असलेल्या लोकांनी धावपळ करून रणजित धाबर्डे आणि शुभम लढे या दोघांना वाचविले. घटनेची माहिती मिळताच हिवरा येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, वडनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बागडे, पोलिस कर्मचारी प्रशांत वैद्य, आशीष डफ, अमोल खाडे, तुषार इंगळे, गुणवंता चिडाम हेसुद्धा घटनास्थळी पोहोचले. नागरिकांच्या मदतीने शोध घेतला असता ऋतिक पोखळे आणि संघर्ष लढे यांचे मृतदेह नदीबाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणने होर्मुझची सामुद्रधुनी केली पूर्ण बंद, जहाज पेटवून देण्याचा इशारा; तेलाच्या किंमतीचा भडका उडणार, आशियाई देशांना फटका

Supreme Court: न्यायाधीशांनी AI चा वापर करून लिहिला निकाल, अस्तित्वातच नसलेल्या खटल्यांचा संदर्भ; सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?

India Ministry Meeting : युद्धाचा भडका! भारतीय वाणिज्य, उद्योग मंत्रालयाची बैठक, देशातील दिग्गज आले एकत्र; अनेक विषयांवर चर्चा

Iran Oman Sea Attack : ओमानच्या समुद्रात इराणचा हल्ला; भारतीय जहाज लक्ष्य, तीन जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : हॉर्मुझ सामुद्रधुनीतील तणावाने तेलदरात उसळी

SCROLL FOR NEXT