corona vaccination esakal
नागपूर

नागपूरमध्ये लसीकरणाचा ३५ लाख डोसचा टप्पा पार

पहिल्या डोसचे उद्दिष्ट पूर्ण; ‘बुस्टर’ २१ हजारांवर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महानगरपालिकेच्या लसीकरण अभियानाअंतर्गत शुक्रवारी शहरात लसीकरणाचा ३५ लाखांचा टप्पा पार केला. १८ वर्षांवरील सर्व नागरिक, १५ वर्षांवरील मुले आणि बुस्टर डोज असे सर्व मिळून नागपूर शहरातील ३५ लाख ७४ हजार ७१८ लसीकरणाचे डोस पूर्ण झाले आहेत.पहिल्या डोसचे लसीकरण निर्धारित उद्दिष्टापेक्षा जास्त झाले असून, आतापर्यंत २१ लाख ६ हजार ७३९ एवढे लसीकरण झाले. १५ ते १८ वर्षे वयोगटातील युवांचे ६७ हजार ४९ एवढे तर बुस्टर डोसचे २१हजार ५२१ एवढे लसीकरण डोस झाले.

नागपूर शहरात लसीकरणासाठी पात्र सर्व व्यक्तींचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध भागात १५० वर लसीकरण केंद्रांची व्यवस्था केली असून, १८ वर्षांवरील वयोगटाच्या नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. १५ ते १८ वर्षे वयोगटातील युवांसाठी विशेष केंद्रांची व्यवस्था केली आहे. कोरोनाच्या संक्रमणापासून बचाव व्हावा यासाठी कोव्हिड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आणि लसीकरण अत्यंत प्रभावी आहे. नागपूर शहरातील प्रत्येक पात्र व्यक्तीने आपले लसीकरण पूर्ण करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपले लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करून घ्यावे तसेच ज्यांचे दुसरा डोस घेऊन ९ महिने पूर्ण झाले त्यांनी ‘बुस्टर’ डोस घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले.

राज्य शासनाच्या आरोग्य विभागानुसार ‘हर घर दस्तक’ मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत लस न घेतलेल्या पात्र नागरिकांचा शोध घेऊन त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करून शहरातील शंभर टक्के पात्र नागरिकांना डोस देण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले. केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार शहरातील १५ ते १८ वर्षांवरील युवांचे लसीकरण सुरू करण्यात आले. दोन्ही डोस घेणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सच्या सुरक्षेच्यादृष्टीने बुस्टर डोस सुरू करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT