भाजी भाजी
नागपूर

सामान्यांच्या ताटातून भाजी गायब; दर दुप्पटीने वाढले

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने सध्या बाजारातील भाजीची आवक निम्याने कमी झालेली आहे. त्यामुळेच भाजीचे भाव दुप्पटीने वाढल्याने सर्वसामान्यांच्या ताटातून भाजी गायब झाली आहे. कोथिंबीर ठोक बाजारात १०० ते १२० रुपये किलो असली तरी किरकोळ बाजारात १८० ते २०० रुपये किलोने विकली जात आहे. टोमॅटोचे भावही आकाशाला भिडले असून गेल्या आठवड्यात ३० रुपये किलो असलेले टोमॅटो आता ६० रुपयांवर गेले आहे.

स्थानिक आणि बाहेरील भाजीची आवक अतिशय कमी झालेली आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू झाले असून छोटे मोठे कार्यक्रमांमुळे भाज्यांच्या मागणीत दुप्पटीने वाढ झालेली आहे. त्या तुलनेत आवक कमी असल्याने भावात वाढ झालेली आहे. नवीन पीक येण्यासाठी अद्यापही २५ ते ३० दिवसाचा कालावधी आहे. त्यामुळे पुढील काही दिवस चढ्याच दराने भाजी खरेदी करावी लागणार आहे.

वांग्याच्या भावात सतत चढेच आहे. कोथिंबीर, मेथी, पालकांचे भाव वाढले आहेत. किरकोळ बाजारात सर्वच भाज्या प्रति किलो ६० ते १०० रुपये किलो झालेल्या आहेत. किरकोळ बाजारातील भाजीचे दर हे वैयक्तीक पातळीवर निश्चित केले जातात. त्यामुळे प्रत्येक बाजारातील दरांमध्ये तफावत आढळते, असे अडतिया भाजी संघटनेचे सचिव राम महाजन यांनी सांगितले.

ठोक बाजारातील भाजीपाला दर (रुपये प्रति किलो)

  • कोथिंबीर - १२० रुपये

  • वांगे ६० रुपये

  • गवार शेंग - ४० रुपये

  • मेथी - १०० रुपये

  • हिरवी मिरची - १५ रुपये

  • चवळी - ३० रुपये

  • फुलकोबी - ४० रुपये

  • पानकोबी ३० रुपये

  • टोमॅटो - ५० रुपये

  • भेंडी - ३० रुपये

  • शिमला मिरची - ४० रुपये

  • तोंडले - ३० रुपये

  • कारले - ४० रुपये

  • कोहळा - ३० रुपये

  • दुधी भोपळा - २० रुपये

  • पालक - ४० रुपये

  • ढेमस - ६० रुपये

  • गाजर -३० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेल अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

चोरीचे दागिने घेणारा सराफही आरोपी! पावतीशिवाय दागिने घेतल्यास पोलिसांकडून कारवाई; ‘या’ कलमाखाली 3 वर्षांपर्यंत कारावास अन्‌ दंडाची शिक्षा, वाचा...

जिल्हा परिषदेच्या भन्नाट योजना! महिलांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी; सातवी ते बारावीतील मुलींना सायकली, टॅली, MS-CIT, कराटे प्रशिक्षण, गरीब मुलांना पैसेही

Best Banana French Toast: बिझी मॉर्निंगसाठी बेस्ट! 10 मिनिटांत बनवा बनाना फ्रेंच टोस्ट; लिहून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT