नागपूर

Crime: अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात न्यायालयाचा निकाल ! आरोपीला ३ वर्षांची शिक्षा

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी आरोपीला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तीन वर्षे सश्रम कारावास आणि तीन हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

सकाळ डिजिटल टीम

Wardha Crime News: अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी संजय शिवराम डोंगरे (वय २९) रा. वर्धा याला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तीन वर्षे सश्रम कारावास आणि तीन हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी हा निकाल दिला.

थोडक्यात असे की, पीडिता ही सातव्या वर्गात वर्धा येथे शिक्षण घेत होती. दुपारी शाळेतून घरी आल्यावर ती अंगणात खेळत होती. यावेळी संजय डोंगरे ती एकटी असल्याची संधी साधत तिचा विनयभंग केला. पीडितेने ही घटना प्रथम मैत्रिणीला, नंतर आईला सांगितली. आई-वडिलांनी सोबत येत थेट शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. प्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक एस. एस. बिसंदरे यांनी केला. आरोपीने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सरकारतर्फे विशेष सरकारी अभियोक्ता विनय घुडे यांनी कामकाज पाहिले व युक्तीवाद केला. देवेंद्र कडू यांनी साक्षदाराना हजर केले. शासनातर्फे चार साक्षदार तपासले. साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून.अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी तीन वर्षे सश्रम कारावास आणि तीन हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT