file 
नागपूर

कळमेश्वर पालिकेत काय घडले की बैठकीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मारली दांडी...

चंद्रकांत श्रीखंडे

कळमेश्व (जि.नागपूर)  : नगर परिषद कळमेश्वर-ब्राम्हणीच्या वतीने मंगळवारी (ता.११) शहरात वाढत असलेले कोरोना रुग्ण व संक्रमण लक्षात घेता दोन दिवसीय जनता कर्फ्यूच्या नियोजनाबाबतची  बैठक घेण्यात आली होती.  व्यावसाईक, नागरिक राजकीय पक्षांचे पदाधिकारी, संबंधित सर्व अधिकाऱ्यांना महत्वाच्या या बैठकीस बोलावण्यात आले होते. परंतू कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक! बैठकीला एकही अधिकारी व कर्मचारीच उपस्थित नसल्याने बैठकीचा पार फज्जा उडाला. यामुळे कोरोना महामारीबाबत स्थानीय प्रशासन किती दक्ष आहे, हे सर्व नागरिकांना कळून चुकले.

अधिक वाचा  : बैल पोळा सण आला आठ दिवसांवर, बैलांचा साज विकणारे फिरतात गावोगावी...

शहरातील नाजूक स्थितीबाबत गांभीर्य नाही
नगरपालिका कळमेश्वर-ब्राम्हणी क्षेत्र कोरोना संक्रमणाने मोठ्या प्रमाणात पछाडलेले असून आजपर्यंत पंधरा दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. कोरोना संक्रमण रोखण्यात पालिका प्रशासन सपशेल फेल ठरले असून कुठलेही ठोस नियोजन अधिकाऱ्यांकडून राबविले जात नाही. सोशल डिस्टेनिंगचा शहरात पार धज्जा उडाला आहे. न.प.अध्यक्ष व उपाध्यक्षांनी आयोजित बैठकीला शासनाचे सबंधित अधिकारी, मुख्याधिकारी, तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी, पोलिस निरिक्षक व सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती महत्वाची होती. अधिकाऱ्यांशिवाय न.प.पदाधिकारी किंवा स्थानिक नागरिक कुठलेही निर्णय घेवू शकत नाही. परंतू न.प.पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या बैठकीला एकही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.

घडले मानापमान नाट्य?
सद्यस्थितीत शहरातील बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून सोशल डिस्टेनिंगसह शासनाचे सर्व निकष पालिका प्रशासनाकडूनच खुद्द धुळीस मिळविले जात आहेत. महामारी रोखण्यास कुठलीही उपाययोजना मुख्याधिकारी राबवित नाही. पदाधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये असहकाराची भावना निर्माण झाली आहे. मुख्याधिकारी व अधिकारी मुख्यालयी न राहता नागपुरवरुन ये-जा करतात. त्यामुळे शहरवासींच्या वाढत्या संक्रमणासह आारोग्याप्रती त्यांना काहीही सोयरसुतक नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. क्वारंटाईन रुग्णांना वाऱ्यावर सोडण्यात येत आहे. त्याची कुलीही काळजी घेतली जात नाही. एकही कर्मचारी दखल घ्यायला तयार नाही. नियमीत जंतुनाशक फवारणी केली जात नाही. तापमापक यंत्र नाही, कोरोना संक्रमण साखळी तोडणे शहरवासींसाठी गरजेचे आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी असहकाराची भावना या महामारीत थांबवावी . निदान मुख्याधिकारी तरी या बैठकीला उपस्थित राहणे गरजेचे होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. बैठकीत न.प.अध्यक्ष स्मृती ईखार, उपाध्यक्ष ज्योत्सना मंडपे, डॉ. राजीव पोतदार, माजी नगराध्यक्ष फत्तेसिंग मरडवार आदींसह बैठकीला न.प.सदस्य, व्यापारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिकारी आम्हाला बोलाविण्यात आले नसल्याचे सांगतात. परंतू काय घडले हे कोणीच सांगत नाही.

बैठकीला बोलावलेच नाही
काल घेण्यात आलेल्या बैठकीची मला माहिती व निमंत्रणच देण्यात आले नाही. न.प.पदाधिकाऱ्यांनी मला बोलावले असते तर मी आलो असतो.
सचिन यादव
तहसीलदार, कळमेश्वर

संपादन  : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT