बुटीबोरी : रुग्ण आढळताच परिसरातील बंदोबस्तासाठी आढावा घेताना प्रशासकीय अधिकारी.  
नागपूर

का वाढतोय बुटीबोरी एमआयडीसीत कोरोनाचा प्रसार? कदाचित हे असावे कारण..

जितेंद्र वाटकर

टाकळघाट (जि. नागपूर)  :    आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेली बुटीबोरी वसाहत. येथे गेल्या काही दिवसांपासून वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने प्रशासन हादरले आहे. या ठिकाणी कामगार सतत संक्रमित निघत असल्याने बुटीबोरी एमआयडीसी भविष्यातील कोरोनाचा नवा "हॉटस्पॉट' ठरेल, असे भाकित वर्तविले जात आहेत. त्यामुळे कंत्राटदार व कंपनी व्यवस्थापन यावर प्रशासन कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

अधिक वाचा :   कोरोनासे नही क्‍वारंटाईनसे डर लगता है साहाब, काय आहे कारण...

परप्रांतातून आणले जातात मजूर
बुटीबोरी एमआयडीसीमधील कामगार वसाहत गेट नं. 7 या ठिकाणी कोरोनाचा पहिला रुग्ण मिळाला होता. परंतु, प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनेमुळे परिसरातील नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळाला. काही दिवस परिसरात शांतता असताना मध्येच 11 व 12 जुलै रोजी एमआयडीसी परिसरात एका कंत्राटदाराने पश्‍चिम बंगाल तर दुसऱ्या कंत्राटदाराने बिहार येथून कामगार आणल्याने कोरोनाने पुन्हा "एंट्री' केली. सहा रुग्ण संक्रमित असल्याची माहिती पुढे आली. त्यात टाकळघाट 1 रुग्ण, इंडोरामा कॉलनी गेट नं. 1 मधील 1 रुग्ण, इग्लू डेयरी परिसरात 2 रुग्ण तर सिस्कोन कंपनीत 2 रुग्ण अशा सहा रुग्णांचा अहवाल "पॉझिटिव्ह' आल्याने परिसरातील नागरिकांत दहशत पसरली. प्रशासन उपाययोजना करण्यात व्यस्त झाले. त्यात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पडवे यांच्या पथकाने रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 57 जणांना क्‍वारंटाइन केले. त्यातून मंगळवारी पुन्हा 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण संक्रमित संख्या 21 झाली आहे.

अधिक वाचा :"हे' गवत आहे भयंकर विषारी, मात्र मोवाडवासींची ठरली डोकेदुखी...

कामगार, कंत्राटदार यांच्यावर वचक कुणाचा?
सगळीकडे सुरू असलेला कोरोनाचा प्रकोप लक्षात घेता, लॉकडाउन झाल्यावर काही काळाने शिथिलता मिळाली. त्यातच कंपन्या हळूहळू सुरू झाल्या. कंपनीत कामगार लागत असताना कंपनी प्रशासनाकडून स्थानिकांना प्राधान्य न देता बाहेरून कामगार आणण्याकडे जोर आहे. त्यातच इंडोरामा कंपनीच्या एका ठेकेदाराने बाहेरून कामगार आणले, तर त्यातील एक संक्रमित आढळून आला. त्या एकाचा शोध घेण्यासाठी आरोग्य प्रशासनाची दमछाक झाली. म्हणजेच कंपनी प्रशासन ठेकेदाराकडून परप्रांतीय कामगार बोलावतात. त्यांची देखरेख व त्यांना क्‍वारंटाइन व त्यांची तपासणी करणे हे कंपनी व कंत्राटदाराची जबाबदारी असताना हात ढकलल्या जाते आणि त्या बाहेरून आणलेल्या कामगारातून संक्रमित रुग्ण बाहेर येतात. ते संक्रमित कोणाच्या तरी संपर्कात आल्यावर अन्य कामगारांना संक्रमित करतात. यावर प्रशासनाने वेळीच नियंत्रण आणले नाही, तर एमआयडीसी बुटीबोरीमध्ये बऱ्यांच कंपन्या असल्याने अन्य कंपन्यांचीसुद्धा हिंमत वाढणार असून, भविष्यातील बुटीबोरी एमआयडीसी कोरोनाचा नवा "हॉटस्पॉट' होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
 
अधिक वाचा :  "त्याला' बुडताना पाहून मित्र गेले पळून, नंतर सायंकाळी घडले असे...

स्थानिक स्वराज्य संस्थांनी नोंद घ्यावी!
आशिया खंडातील मोठी बुटीबोरी औद्योगिक वसाहत असल्याने कंपन्यांमध्ये नेहमी कामगारांची गरज असते. कंत्राटदार कंपनीला बाहेरून कामगार आणून पुरवितात. परंतु, आता कोरोना परिस्थिती असल्याने बाहेरून येणाऱ्या कामगारांची स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत) येथे नोंद करून त्याची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे. त्यांना 14 दिवस क्‍वारंटाइन केले जाते. त्यानंतर त्यांना कामावर घेतले जाते. परंतु, कंपनी व कंत्राटदारांकडून नियमांचे सर्रास उल्लंघण होत आहे.

आम्ही खबरदारी घेत आहोत!
कंपनीत परप्रांतीय कामगार आणले जात आहेत. तेथील व्यवस्थापन व कंत्राटदार यांना शासनाने दिलेले सर्व नियम पाळण्याच्या सूचना आम्ही दिल्या आहेत. यानंतर कोणताच कामगार पॉझिटिव्ह निघणार नाही, यासंबंधी खबरदारी घेत आहोत.
-प्रदीप खंडेलवाल
अध्यक्ष, बीएमए.

संपादन : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction: डोळ्यांत अश्रू, बोलायला शब्द नाहीत… शिक्षकाच्या मुलावर IPL लिलावात कोट्यवधींचा वर्षाव, बापाचं स्वप्न साकार झालं

Yashasvi Jaiswal Hospitalized : यशस्वी जैस्वालची तब्येत बिघडली; पुण्यातील रुग्णालयात तातडीने करावं लागलं भरती; कशी आहे प्रकृती?

भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून हल्ला; घटना CCTVमध्ये कैद

Latest Marathi News Live Update : वांद्रे–वरळी सी लिंकवर थरारक ड्रायव्हिंग, 250 किमी प्रतितास वेगाने कार चालवणाऱ्याविरोधात गुन्हा

Coinex Pune 2025 : दुर्मीळ नाण्यांचा खजिना बघण्याची पुणेकरांना संधी; ‘कॉइनेक्स पुणे २०२५’ शुक्रवारपासून

SCROLL FOR NEXT