Wild Pigs Attack In Beed District
Wild Pigs Attack In Beed District 
नागपूर

नागपूर : रानडुकराच्या हल्ल्यात महिला ठार

सकाळ वृत्तसेवा

रामटेक : बकऱ्या चारण्यासाठी गेल्या महिलेवर रानडुकराने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. तिला नागपूरच्या रुग्णालयात हलविले असता मृत घोषित करण्यात आले. ही घटना आदिवासीबहुल पवनी ते हिवरा बाजार मार्गावरील खरपडा येथे सोमवारी दुपारी २ वाजता घडली.

दुर्गाबाई नत्थुजी इनवाते वय अंदाजे (५२) रा. खरपडा असे मृत महिलेचे नाव असून तिला पती व एक मुलगी आहे. पवनीचे वनपरीक्षेत्र अधिकारी रितेश भोंगाडे यांनी दिलेल्या माहीतीनुसार, २१ मार्चला दुर्गाबाई बकऱ्या घेऊन तलावाजवळ चारायला घेऊन गेली होती. यावेळी गावातीलच एक महिलाही बकऱ्या चारत होती.

तलावाच्या पलीकडे लागुनच जंगल आहे. दरम्यान अचानक एका रानडुकराने दुर्गाबाईवर हल्ला केला. यात दुर्गाबाईची पाठ भाग व हाताला गंभीर दुखापत झाली. तेव्हा दुसर्या असलेल्या महिलेने रानडुकराला हाकलण्याचा अपयशी प्रयत्न केला. यानंतर लगेच ही वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली. पवनी वनविभागाला कळविण्यात आले. काही वेळातच वनविभागाचे कर्मचारी हजर झाले. त्यांनी दुर्गाबाईला वन विभागाच्या वाहनातच प्राथमिक आरोग्य केंद्र देवलापार येथे घेऊन गेले. मात्र प्रकृर्ती गंभीर असल्याने १०८ रुग्णवाहिकेने तिला नागपूरला हलविण्यात आले. मात्र येथे तिला तपासणीअंती मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे.

१५ लक्ष रुपयांची भरपाई मिळणार - आरएफओ भोंगाडे

सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला असून वरिष्ठांना तात्काळ माहिती देण्यात आली आहे. कागदपत्रांची कार्यवाही पुर्ण झाल्यावर दुर्गाबाईच्या वारसांना वनविभागाकडून १५ लक्ष रुपयांची भरपाई देण्यात येणार असल्याचे आरएफओ रितेश भोंगाडे यांनी माहिती देताना सांगितले.

प्राण्यांच्या हैदोसामुळे शेती करणे सोडले

खरपडा येथील एका ग्रामस्थाने सांगितले की या भागात वन्य प्राण्यांचा फार मोठ्या प्रमाणात हैदोस सुरू असतो. शेतातच नव्हे तर चक्क गावात सुद्धा शिरून घराजवळच्या भाजीपाल्यांच्या वाडीत शिरून मोठे नुकसान करतात. यामुळे त्रस्त होऊन या परिसरातील काही शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT