नागपूरचा पारा १२.४ अंशांवर; विदर्भात थंडीची लाट
नागपूरचा पारा १२.४ अंशांवर; विदर्भात थंडीची लाट sakal media
नागपूर

नागपूरचा पारा १२.४ अंशांवर; विदर्भात थंडीची लाट

नरेंद्र चोरे : सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कडाक्याच्या थंडीसाठी प्रसिद्ध असलेला डिसेंबर महिना उंबरठ्यावर असल्याने विदर्भात हळूहळू थंडीचा कडाका वाढू लागला आहे. गेल्या दोन दिवसांत नागपूरच्या तापमानात तब्बल सहा अंशांची घसरण होऊन, पारा यंदाच्या हिवाळ्यात प्रथमच १३ अंशाच्या खाली आला असल्याचे प्रादेशिक हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

उत्तर भारतातील पहाडी भागांत बर्फवृष्टी सुरू असल्यामुळे विदर्भात अचानक गारठा वाढला आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी १८.३ अंशांवर असलेला पारा घसरून आज १२.४ अंशांवर आला. रविवारी नागपुरात नोंद झालेले किमान तापमान यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी ठरले. विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद यवतमाळ येथे १२ अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली.

गोंदिया (१२.८ अंश सेल्सिअस), वर्धा (१३.९ अंश सेल्सिअस), अमरावती (१४ अंश सेल्सिअस), चंद्रपूर (१४ अंश सेल्सिअस) व ब्रम्हपुरी (१४.३ अंश सेल्सिअस) येथेही पाऱ्यात लक्षणीय घट झाली. सायंकाळ होताच हवेत गारठा निर्माण होतो. पहाटेच्या सुमारास थंडीची तीव्रता आणखीनच वाढते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT