dilip walse patil Sakal
नागपूर

प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलिस ठाणे

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ; नागपूर व गडचिरोली परिक्षेत्राचा घेतला आढावा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्यात महिलांसंदर्भातील वाढते गुन्हे, घटना यातील दोष सिद्धी याचा अपप्रचार अधिक होतो. यात पोलिसांच्या भूमिकेबाबत योग्य संदेश जावा, या गुन्ह्यांकडे सरकार बारकाईने बघत आहे. नागरिकांच्या मनातील पोलिसांबद्दलची भीती जाऊन आदर निर्माण व्हावा, यासाठी संपूर्णतः महिलांनी चालविलेले एक पोलिस ठाणे प्रत्येक जिल्ह्यात निर्माण करण्याचे निर्देश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

नागपूर पोलिस मुख्यालयात नागपूर व गडचिरोली परिक्षेत्राच्या पोलिस दलाच्या कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला. बैठकीला विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, दोन्ही परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हा पोलिस अधीक्षक जिल्हा पोलिस उपअधीक्षक उपस्थित होते. गृहमंत्री म्हणाले, बलात्कार आणि लूटमार यासंदर्भातील घटनाक्रम गेल्या काही वर्षांमध्ये वाढत आहे. छोट्या-मोठ्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही संख्या वाढ झाली का? याचा विचार करण्याची ही वेळ आहे.

एकदा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांचे काम संपणार नाही. यापुढे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे प्रमाण गुन्हा सिद्धतेवरून ठरेल. एकदा गुन्हा दाखल झाला तर कायद्याच्या कचाट्यातून आपण सुटणार नाही, अशी भीती गुन्हेगारांना वाटली पाहिजे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवण्याची हिंमत कोणी करू नये, महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यशैलीबद्दल भ्रम निर्माण करणाऱ्यांना पारदर्शी कारभाराने, व्यापक जनसंपर्काने उत्तर द्या, पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांची गय करू नका, असे स्पष्ट निर्देश गृहमंत्र्यांनी दिले.

युवकांना नक्षल चळवळीकडे वळू देऊ नका

गडचिरोली जिल्ह्यातील काही सामाजिक प्रश्नांना गंभीरतेने ऐकून घेत धोरणात्मक निर्णय घेऊ असे सूतोवाच केले. कोणत्याही परिस्थितीत या जिल्ह्यातील युवक नक्षल चळवळीकडे वळता कामा नये. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास शासन तत्पर असल्याचे त्यांनी यावेळी आश्वस्त केले.दर दोन महिन्यात गडचिरोली परिक्षेत्रासंदर्भात मागणी आणि पूर्तता याबाबत आढावा घेतला गेला पाहिजे, असे त्यांनी सुचविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT