नागपूर

ऑगस्टची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून समन्वयाने काम करा

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या पूरपरिस्थितीने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे यावर्षी अशी परिस्थिती उद्भवू नये, या अनुषंगाने जलसंपदा, कृषी, महावितरण, सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्यासोबतच समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विमला आर यांनी शुक्रवारी दिले. (Work-in-coordination-Flood-situation-Collector-Vimala-R-NagpurNews-nad86)

छत्रपती सभागृहात मॉन्सूनपूर्व तयारीच्या आढाव्याच्या अनुषंगाने आयोजित ऑनलाइन बैठकीत त्या बोलत होत्या. आपत्ती व्यवस्थापनाच्या काळात कागदावरील नियोजनापेक्षा प्रत्यक्ष साधनसामग्रीची सुसज्जता, बोटी, रोप, लाइफ जॅकेट आदी साहित्य अद्ययावत असणे गरजेचे आहे. तालुका किंवा गावपातळीवर कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यास सर्वांत आधी जिल्हा प्रशासनाला कळवा. जिल्ह्यातील सर्व आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या दूरध्वनीची खात्री सर्व अधिकाऱ्यांनी करावी, स्वत: दूरध्वनी करावेत. जबाबदारी निश्चित करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

हवामान संबंधित वेळोवेळी हवामान खात्याने दिलेले अलर्ट नागरिकांना द्यावे. पूरप्रवण गावातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येणाऱ्या निवारागृहात स्वच्छता असावी. पूर परिस्थिती असलेल्या गावात संसर्गजन्य आजाराचा फैलाव होण्याची शक्यता असते, ते पाहता आरोग्य अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, असेही त्या म्हणाल्या.

तिन्ही पातळीवर समन्वयाने काम करा

धरणातून करण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबाबत सिंचन विभागांनी तत्परतेने संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी. संवाद, संपर्क, सतर्कता या तिन्ही पातळीवर समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. लहान मुले, अपंग व वृद्धांचे स्थलांतर करताना योग्य ती काळजी घ्या. आपत्ती काळात एनडीआरएफ व एसडीआरएफच्या लोकांशी संपर्क करा. तसेच त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

(Work-in-coordination-Flood-situation-Collector-Vimala-R-NagpurNews-nad86)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT