Nagpur Crime  Esakal
नागपूर

Yavatmal Crime: सराफा व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरडी पूड टाकून ११ लाख लुटले; यवतमाळमधील घटना

Chilly Powder Used For Loot: सराफा व्यावसायिक तालुक्यातील सावळी कोळवण शेतशिवाराजवळ चार अनोळखी लुटारूंनी शस्त्राच्या धाकावर व डोळ्यात मिरची पावडर टाकून व्यावसायिकाला लुटले.

सकाळ डिजिटल टीम

Yavatmal Crime Jewelry Shop Owner looted : सराफा व्यावसायिक तालुक्यातील सावळी सदोबा येथून स्वत:च्या कारने आर्णीकडे येत असताना कोळवण शेतशिवाराजवळ चार अनोळखी लुटारूंनी शस्त्राच्या धाकावर व डोळ्यात मिरची पावडर टाकून व्यावसायिकाला लुटले. ही घटना सोमवारी (ता.चार) सायंकाळी साडेसहा वाजता घडली.

लुटारू हे पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर वाहनातून आले होते. आर्णी येथील सराफा व्यावसायिक विशाल लोळगे यांचे गोविंद ज्वेलर्स तर, दुसरे सराफा व्यावसायिक मित्र रंजित हनुमंत काटे यांचे तुळजाभवानी नामक ज्वेलर्स सावळी सदोबा येथे आहे. सोमवारी सायंकाळी सावळी येथील ज्वेलर्सचे दुकान बंद करून नेहमीप्रमाणे विशाल लोळगे हे समोरील सीटवर बसले तर मुलगा करण विशाल लोळगे हा कार चालवत होता.

रंजित काटे हे मागील सीटवर होते. असे तिघेजण आर्णीकडे येत असताना सावळी रोडवरील अनिल राठोड यांच्या विट्टभट्टीजवळ विशाल लोळगे यांच्या कारसमोर विना क्रमांकाची पांढऱ्या रंगाची डिझायर कार अचानक समोर आली व सराफा व्यावसायिकांच्या कारसमोर उभी केली. डिझायरमधून वीस ते तीस वर्ष वयोगटातील तोंडाला दुपट्टा बांधलेले चार अनोळखी इसम खाली उतरले. (Latest Marathi News)

त्यांनी विशाल लोळगे यांच्या कारचे काच फोडून कारमधील तिघांच्याही चेहऱ्यावर मिरची पावडर फेकले तसेच चाकू व पिस्तूल सदृश वस्तूंचा धाक दाखवून विशाल लोळगे यांच्याजवळ असलेल्या बँगमधून रोख एक लाख ६५ हजार रुपये व सोन्याचे दागिने ३०७ ग्रॅम, अंदाजे ९ लाख ७१ हजार ८६४ रुपये, असा एकूण ११ लाख ३६ हजार ८६४ रुपयांचा मुद्देमाल हिसकावून नेला. या प्रकरणी विशाल लोळगे यांनी आर्णी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी लुटारूंचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT