नागपूर

उमेदवारी वाटपचा ८०ः२० फॉर्म्युला बदला! राष्ट्रीय अध्यक्षांकडे युवक काँग्रेसची मागणी

राजेश चरपे -सकाळ वृत्तसेवा

सर्वच पक्षांनी आता तरुणांकडे नेतृत्व सोपवणे सुरू केले आहे. त्यामुळे उमेदवारी वाटपाचे जुने सूत्रही बदलणे आवश्यक आहे. ८०:२०चा फॉर्म्युला बदवून आता २०:८० असा करण्यात यावा, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास यांच्याकडे करण्यात आली.

नागपूर : पक्षाच्या आंदोलनात ऐंशी टक्के युवक सहभागी होतात. मात्र महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उमेदवारी देताना फक्त २० टक्केच तरुणांचा विचार केला जातो. हे सूत्र आता बदलवण्यात यावे, अशी मागणी युवक काँग्रेसच्यावतीने राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. वी. यांच्याकडे करण्यात आली.

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय श्रीनिवास बी.वी. नागपूर दौऱ्यावर आले असताना त्यांचे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव तसेच नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत केले. नागपूरच्या सर्व घडामोडी त्यांच्या कानावर घातल्या. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात युवक काँग्रेसने लोकांना केलेल्या मदतीची माहिती दिली. नागपूरमध्ये केंद्र सरकाराच्या विरोधात, इंधन दरवाढ असो की इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर केलेल्या आंदोलनाचीही सविस्तर माहिती देण्यात आली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर आंदोलन करण्याची आजवर कोणी हिंमत करीत नव्हते. मात्र युवक काँग्रेसने ते धाडस केले. पक्षाचा प्रचार व ध्येयधोरणे राबवण्यातही युवक काँग्रेस आघाडीवर असते. मात्र महापालिकेची उमेदवारी देताना युवक काँग्रेसला फक्त २० टक्केच कोटा ठरवून देण्यात आला आहे. हा तरुणांवर अन्याय आहे. सर्वच पक्षांनी आता तरुणांकडे नेतृत्व सोपवणे सुरू केले आहे. त्यामुळे उमेदवारी वाटपाचे जुने सूत्रही बदलणे आवश्यक आहे. ८०:२०चा फॉर्म्युला बदवून आता २०:८० असा करण्यात यावा, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास यांच्याकडे करण्यात आली.

काँग्रेसला वाचवा

नागपूर महापालिकेत १५ वर्षांपासून काँग्रेसची सत्ता नाही. नगरसेवकांची संख्या ३०च्या घरात आली आहे. काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीचे हे अपयश आहे. सहापैकी फक्त दोनच विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहे. काँग्रेसची ही घसरण रोखण्यासाठी आगामी मनपाच्या निवडणुकीत युवक काँग्रेसला सर्वाधिक प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव नगरसेवक बंटी शेळके यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT