Zilla Parishad sakal
नागपूर

Nagpur : पॉलिमार दप्तरावरून मुख्याध्यापकांना धरले धारेवर

दप्तर धूळखात प्रकरण सर्व साहित्याचा वापर करण्याच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा

Nagpur : कोट्यवधी रुपये खर्चून शाळांमध्ये पॉलिमार दप्तर खरेदी करण्यात आले होते. परंतु हे दप्तर आता धुळखात पडून आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला आहे. यावर जिल्हा परिषदेच्या सीईओ सौम्या शर्मा यांनी नाराजी व्यक्त करीत मुख्याध्यापकांना चांगलेच धारेवर धरले. या विद्यार्थ्यांच्या नावे शाळेत आलेल्या सर्व साहित्याचा वापर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

पॉलिमार दप्तरचा विषय चांगलाच गाजला होता. तत्कालीन शिक्षण सभापती व तत्कालीन शिक्षणाधिकारी यांच्यावर विरोधकांकडून गंभीर आरोप लावण्यात आले होते. परंतु नंतर प्रकरण शांत झाल्याने चांगलीच चर्चा रंगली होती. या दप्तराचा फायदा विद्यार्थ्यांना होईल, असा दावा करण्यात आला होता.

परंतु प्रत्यक्षात याचा फायदा विद्यार्थ्यापेक्षा इतरांना जास्त झाल्याची चर्चा होती. मध्यंतरीच्या काळात शर्मा यांनी स्वत:ही शाळास्तरावर भेटी दिल्या असता, त्यांना काही प्रकार निदर्शनास आले. यावरून त्यांनी शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांचीही चांगलीच कानउघाडणी केली होती.

प्रयोगशाळेचे साहित्य ही ‘पेटी बंद’

नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात होताच विद्यार्थी हितार्थ विविध विषयांवर सीईओ सौम्या शर्मा यांनी नुकतीच जि.प.मुख्यालयात गटशिक्षणाधिकारी (बिईओ), शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांनी एक बैठक घेतली. या बैठकीत विविध विषय चर्चेला आले. नुकत्याच जिल्हास्तरावरील बैठकीतही त्यांनी विज्ञान प्रयोगशाळा धूळखात पडून असल्याबाबत संताप व्यक्त केला.

जि.प.च्या सुमारे ७५ वर शाळांना विविध योजनांतून विज्ञान प्रयोगशाळा पुरविण्यात आल्या. विद्यार्थ्यांना विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी कोट्यावधीच्या निधीतून हे विज्ञान प्रयोगशाळेचे साहित्य पुरविण्यात आले.

परंतु आज ते वापराअभावी पडून असल्याने त्यांनी संताप व्यक्त करीत त्या प्रयोगशाळांचा अधित चांगल्या पद्धतीने वापर करण्याच्या सूचना केल्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या भावात घसरण! सणासुदीत 10 ग्रॅमचा भाव किती? पाहा ताजा दर

America Car Culture : अमेरिकेत मर्सिडीज-बीडब्ल्यू पाहून श्रीमंत समजू नका! भारतीय तरुणाने सांगितलं धक्कादायक वास्तव, पाहा VIRAL VIDEO

Dusseldorf Ganeshotsav : ड्युसेलडॉर्फमध्ये गणरायाची भव्य मिरवणूक; ढोल-ताशांच्या गजरात रंगला मराठमोळा उत्सव

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत हिमांशू ढिल्लनला रौप्य, तर रुद्रांक्ष पाटीलला कांस्य पदक

IND vs WI, ODI: रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्ध घालणार धुमाकूळ? सचिन, डिविलियर्सचे विक्रम मोडण्याची संधी

SCROLL FOR NEXT