Anjali's body was found 36 hours later 
नागपूर

३६ तासानंतर आढळला अंजलीचा मृतदेह

इसासनीतील नाल्याच्या पुरात मायलेकीचा बळी

सकाळ वृत्तसेवा

हिंगणा - रविवारी रात्री भीमनगर येथील मायलेकी पुरात वाहून गेल्या होत्या. आईचा मृतदेह घटनेच्या काही वेळात काही दूरवर मिळाला होता, तर मुलीचा शोध सुरू होता. शेवटी सुमारे ३६ तास लोटल्यानंतर आज (ता. १२) सकाळी ११ वाजता घराशेजारी असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या पाण्यावर अंजलीचा मृतदेह तरंगताना गावकऱ्यांना दिसला. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.

हिंगणा तालुक्यात रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे इसासनीतील भीमनगरमधील नाला ओसंडून पुराचे पाणी रस्त्यावर पसरले व याच पुराच्या लोंढ्यात मायलेकी ( ता.१०) रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान वाहून गेल्या होत्या. आईचा मृतदेह रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान आढळून आला होता. मात्र मुलीच्या मृतदेहाचा शोध लागत नव्हता. ठाणेदार उमेश बेसरकर, पोलिस प्रशासन व नायब तहसीलदार निलेश कदम हे स्थानिक प्रशासन व नागरिकांच्या मदतीने या मुलीचा शोध घेत होते. आज सकाळी शोध मोहीम सुरू असताना काही लोकांना मयताच्या घराशेजारी असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यात पाण्यावर तरंगताना अंजलीचा मृतदेह दिसला.

आई सुकवन राधेलाल मातरे (४५) नंतर आता मुलगी अंजली राधेलाल मातरे (१७)हिचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या दोन झाली आहे. रविवारच्या रात्रीपासून अंजलीचा शोध सुरू होता. आई सुकवान हिचा मृतदेह घटनास्थळापासून सुमारे एक किमी अंतरावर भेटला होता. पाण्याचा प्रवाहाच्या वेगावरून मृतदेह लांब दूरवर वाहून गेला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. त्यानुसार हिंगणा पोलिसांना सुद्धा माहिती देण्यात आली होती. मात्र अंजलीचा मृतदेह हा जवळच्या बंधाऱ्यात मिळाला .ती पाण्याच्या प्रवाहात दूर वाहून न जाता गाळात फसून तिचा मृत्यू झाला.

भविष्यात अश्या घटना घडू शकतात

हिंगणा तालुक्यातील इसासनी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या भीमनगर परिसरात नाल्यावर लोकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. त्यामुळे जलवाहिन्या प्रभावित झाल्या आहेत. जास्त पाऊस पडला की, पाणी निघायला जागाच नाही. प्रशासनाने वेळीच यावर कार्यवाही केली नाही, तर भविष्यात सुद्धा अश्या घटना घडू शकतात. पहिल्याच पावसात दोन जणांचा बळी घेतला आहे. प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे . याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT