file photo
file photo 
विदर्भ

ऑनलाइन सर्व्हिस बुकमध्ये नागपूरची बाजी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : केंद्र व राज्य सरकारने ई-गव्हर्नन्सवर भर दिला असून, सरकारी कर्मचाऱ्यांचे "सर्व्हिस बुक ऑनलाइन' केले जात आहे. यात नागपूर जिल्हा परिषदेने राज्यात आघाडी घेतली असून, 99 टक्के प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
केंद्र व राज्य सरकारने ई-गव्हर्नन्सवर भर देण्यासाठी अनेक प्रणाली ऑनलाइन केले आहेत. निविदा प्रक्रियेपासून सेवार्थ प्रणालीपर्यंत सर्वच प्रणाली ऑनलाइन होत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या सेवेचा रेकॉर्ड एका क्‍लिकवर उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प राज्यभर राबविला जात आहे. सर्वच जिल्हा परिषदांमधील कर्मचाऱ्यांचे "सर्व्हिस बुक' ऑनलाइन होत आहे. यासाठी कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाइन भरली जात आहे.
नागपूर जिल्हा परिषदेत एकूण 7,991 कर्मचारी आहेत. यातील 7,941 कर्मचाऱ्यांचे "ऑनलाइन सर्व्हिस बुक' झाले आहे. यातील 7,916 कर्मचाऱ्यांचे "सर्व्हिस बुक'ची पडताळणीसुद्धा झालेली आहे. पडताळणी प्रक्रियेत नागपूर प्रथम क्रमांकावर आहे. सात कर्मचाऱ्यांच्या "सर्व्हिस बुक'ची पडताळणी शिल्लक आहे. नागपूर पाठोपाठ नाशिक जिल्हा परिषद आहे. त्यांचे 98.62 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर जळगाव आणि अहमदनगर जिल्हा परिषदेचा क्रमांक आहे. राज्यात पालघर जिल्हा परिषदेतील हे काम फारच संथगतीने सुरू आहे. तेथील पडताळणी प्रक्रियेची टक्केवारी केवळ 0.02 इतकी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

SCROLL FOR NEXT