file photo
file photo 
विदर्भ

शिक्षक, विद्यार्थ्यांची नावे जाणार मंगळावर

सकाळ वृत्तसेवा

पवनी (भंडारा) : "नासा' या जागतिक स्तरावरील अवकाश संशोधन संस्थेने जगभरातील लोकांचा मंगळ मोहिमेत सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने त्यांची नावे मंगळावर पाठविण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. याच उपक्रमांतर्गात तालुक्‍यातील जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल पवनी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदीखेडा येथील विद्यार्थी व शिक्षकांची नावे नोंदविण्यात आली आहेत. त्यांना ऑनलाइन माध्यमातून आलेल्या बोर्डिंग पासचे वाटप शाळेत केले जाणार आहे.
अमेरिकेच्या अर्थात नासा या जगविख्यात अवकाश संशोधन करणाऱ्या संस्थेचे "मंगळ रोव्हर 2020' हे अंतरिक्ष यान लाल ग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावणार आहे. या अंतरिक्ष यानाबरोबर स्टेनसील्ड चीपवर आपली नावे पाठवून मानवी इतिहासातील दुसऱ्या ग्रहावर आपल्या पाऊलखुणा सोडण्याची ऐतिहासिक संधी "नासा'तर्फे जगभरातील सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देण्यात आली आहे. नासाच्या प्रयोशाळेत इलेक्‍ट्रॉनिक बीमचा वापर करून सिलीकॉनच्या चीपवर मानवी केसाच्या एक हजाराव्या भागाइतक्‍या (75 नॅनोमीटर) रुंदीत आपण नोंदविलेली नावे स्टेन्सिल केली जाणार आहेत. इतक्‍या छोट्या आकारात एक डेमी आकाराच्या चीपवर दहा लाख नावे मावतील. या चीप रोव्हरवर काचेच्या आवरणाखाली जतन करून मंगळ ग्रहावर पाठविल्या जातील. या ऐतिहासिक मोहिमेत अशा रूपाने सहभाग होण्याची संधी या शाळांनी प्राप्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT