navegaon nagzira tigress satellite gps collar
navegaon nagzira tigress satellite gps collar Sakal
विदर्भ

वाघिणीच्या गळ्यात पुन्हा जीपीएस कॉलर; पडलेली कॉलर जंगलात आढळल्याने राबविली शोधमोहीम

सकाळ वृत्तसेवा

भंडारा : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलेल्या नवीन वाघिणीचे सॅटेलाईट जीपीएस कॉलर अभयारण्यात आढळून आले. यामुळे वन्यजीव विभागाच्या पथकांद्वारे तिचा युद्धस्तरावर शोध घेण्याची मोहीम राबविण्यात आली. आज सकाळी या एनटी-३ वाघिणीचा ठावठिकाणा शोधून तिच्या गळ्यात पूर्ववत जीपीएस कॉलर लावून जंगलात सोडण्यात आले आहे.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघांचे संवर्धन व स्थानांतरण या उपक्रमाअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एनटी-३ वाघीण ११ एप्रिलला सायंकाळी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील नागझिरा अभयारण्याचे कक्ष क्रमांक ९५ मध्ये निसर्गमुक्त करण्यात आले होते.

त्यानंतर १२ एप्रिलला या वाघिणीच्या जीपीएस कॉलरचे सिग्नल ती एकाच ठिकाणी असल्याचे दाखवीत होते. त्यामुळे १३ एप्रिलला नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील व्हीएचएफ चमू, क्षेत्रीय अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून शोध मोहीम राबविण्यात आली. यात या वाघिणीची सॅटेलाईट जीपीएस कॉलर चालू स्थितीमध्ये नागझिरा अभयारण्यातील कक्ष क्रमांक ९५ मध्ये जमिनीवर पडलेली आढळली.

यानंतर वाघिणीचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्याघ्र प्रकल्पातील व्हीएचएफ चमू व क्षेत्रीय अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून शोधमोहीम राबविण्यात आली. आज सोमवारी (ता. १५) सकाळी नागझिरा अभयारण्यात या वाघिणीचा शोध घेण्यात आला. त्यानंतर सकाळी सुमारे साडेनऊ वाजता वाघिणीला बेशुद्ध करून पुन्हा सॅटेलाईट जीपीएस कॉलर लावून त्याच ठिकाणी निसर्गमुक्त करण्यात आले.

शेवट सुखद झाला

या वाघिणीला नागझिरा अभयारण्यात सोडण्यात आल्यावर दुसऱ्याच दिवशी तिच्या गळ्यातील कॉलर जंगलात पडलेले आढळल्याने व्याघ्र प्रकल्प आणि वन्यजीव विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध विचारांचे काहूर माजले होते. त्यानंतर परिसराची तपासणी केली तेव्हा कोणत्याही घातपाताचे चिन्ह न दिसल्याने त्यांनी सुटकेचा श्‍वास सोडला. दोन दिवसानंतर ही वाघीण आढळली व तिच्या गळ्यात पुन्हा कॉलर लावल्याने या प्रकरणाचा शेवट सुखद झाला, असे म्हणत सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT