Navneet Rana celebrated Ganesh chaturthi in mumbai
Navneet Rana celebrated Ganesh chaturthi in mumbai  
विदर्भ

Video : खासदार नवनीत राणांनी साजरा केला गणेशोत्सव.. बाप्पाकडे केली ही प्रार्थना

सुरेंद्र चापोरकर

अमरावती : कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे मुंबई येथील निवासस्थानी क्वारंटाइन  असलेल्या आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी आपल्या मुंबई येथील निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना केली. 

विशेष म्हणजे खासदार नवनीत राणा यांनी स्वतः मोदक तयार करून गणरायाचा आवडता प्रसाद तयार केला. आज दुपारी फेसबुक लाईव्हद्वारे खासदार नवनीत राणा यांनी नागरिकांशी संवाद साधला. श्री गणेश स्थापनेच्या निमित्ताने सर्व गणेशभक्तांना त्यांनी शुभेच्छा दिल्या, तसेच महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून कोरोना हद्दपार व्हावा व नागरिकांची या कोरोना महामारीतून मुक्तता व्हावी अशीप्रार्थना केली. 

या कोरोना लढ्यात सर्व रुग्णांची मनोभावे सेवा करणारे डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्यसेवक यांना या लढाईसाठी बळ मिळो व त्यांचे आरोग्य चांगले राहो, तसेच सर्व देशातील कोरोना रुग्णांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थना त्यांनी केली. गणेशोत्सवाच्या यादहा दिवसाच्या काळात कोरोनाच्या आजारापासून बचाव करण्यासाठी लस तयार करण्यात तज्ज्ञ वैद्यकीय चमूला यश मिळावे अशी आराधना सुद्धा नवनीत राणा व रवी राणा यांनी केली.

विशेष म्हणजे नवनीत राणा व रवी राणा यांच्या वतीने दरवर्षी अमरावतीत गणेशोत्सव साजरा करण्यात येतो, त्यांच्याकडे हजारो लोक प्रसादासाठी येतात. यंदा पहिल्यांदाच त्यांचा उत्सव मुंबईत साजरा होत आहे.


संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : मोहसीन खानने मुंबईला दिला तगडा झटका

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT