Navneet Rana Esakal
विदर्भ

Navneet Rana: "पोलीस काहीच बिघडवू शकत नाहीत," नवनीत राणांना परत धमकी; विधानसभेच्या तोंडावर अमरावतीत खळबळ

Navneet Rana Threat: राणा यांना त्याच व्यक्तीने चार दिवसांपूर्वी शुक्रवारी (ता. ११) अशाच स्वरूपाचे पत्र पाठवून त्यात नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या बद्दल असभ्य भाषेचाही वापर केला होता.

आशुतोष मसगौंडे

अमरावती: भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत रवी राणा यांना त्याच व्यक्तीने चार दिवसांत धमकीचे दुसरे पत्र सोमवारी (ता. १४) पाठविले आहे. त्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राणा यांच्या शंकरनगरस्थित निवासस्थानी दुपारी दोनच्या सुमारास रजिस्टर डाकेने हे पत्र मिळाले असल्याची माहिती राणा यांचे स्वीय सहायक विनोद गुहे यांनी दिली.

हैदराबाद येथून धमकीचे पत्र पाठविणाऱ्या आमीर नामक व्यक्तीने एफआयआर कितीही दाखल झाले तरी पोलीस आपले काहीच बिघडवू शकत नाही. त्यामुळे यातून सुटण्यासाठी पैसे पाठवावेच लागेल, अशा स्वरूपाची धमकी देण्यात आली आहे. असे विनोद गुहे यांनी सांगितले.

राणा यांना त्याच व्यक्तीने चार दिवसांपूर्वी शुक्रवारी (ता. ११) अशाच स्वरूपाचे पत्र पाठवून त्यात नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या बद्दल असभ्य भाषेचाही वापर केला होता. दुसऱ्या पत्राने गांभीर्य वाढले आहे. शहर पोलिसांनी संबंधित धमकी देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी व त्याला तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी विनोद गुहे यांनी आज (ता. १४) पुन्हा राजापेठ पोलिसांकडे केली आहे. ११ ऑक्टोबरला धमकी देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल झालेला आहे.

राणा यांना केंद्राची सुरक्षा कायम

काही वर्षांपासून केंद्र सरकारने नवनीत राणा या खासदार असतानापासून वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान केलेली आहे. तीच सुरक्षा अद्यापही कायम आहे, असे त्यांचे स्वीय सहायक विनोद गुहे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'लालबाग राजा'च्या मुख्य गेटसमोर 'हिट अँड रन', २ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, एक जखमी

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पुण्यातील मानाचा पाचवा गणपती केसरी वाडा मंडई चौकात दाखल, पाहा थेट प्रेक्षपण

आणखी एका अभिनेत्रीने सोडली 'तू ही रे माझा मितवा' मालिका; तिच्याजागी दिसणार 'ही' गाजलेली अभिनेत्री

Latest Maharashtra News Updates : गिरणा धरणाचे 6 दरवाजे प्रत्येकी 30 सेंमीने उघडले गेले आहेत

Srirampur Crime:'नशेच्या इंजेक्शनच्या तस्करीवर धडक कारवाई'; श्रीरामपूरमध्ये वाढते जाळे उघडकीस, तरुणाईसाठी धोक्याचा इशारा

SCROLL FOR NEXT