Crime
Crime 
विदर्भ

हाजीबाबाचा आणखी एक साथीदार अटकेत

सकाळवृत्तसेवा

नागपूर - नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) घुग्गुसच्या शेख हाजीबाबा शेख सरवरला अटक केल्यानंतर त्याच्या एका साथीदारालादेखील अटक केली. पिंटू ऊर्फ मंगेश उखनकर (वणी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बुधवारी एटीएसने कालू ऊर्फ जतिंदरसिंग (वेकोलि वसाहत, वणी) याला अटक केली होती. आतापर्यंत या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची संख्या ५ वर गेली आहे.

२५ जानेवारी रोजी शस्त्रांची तस्करी करण्याच्या प्रयत्नात दहशतवाद विरोधी पथकाने वणीचा संजय खरे आणि बिहारचा सुपनसिंह यांना पकडले होते. त्यांच्याजवळून २ पिस्तूल आणि २० काडतुसे जप्त करण्यात आली. संजयने दिलेल्या माहितीवरून हाजी बाबाचे नाव समोर आले. पप्पू हा जिमचालक आहे. जिममध्ये येणाऱ्या बॉडीबिल्डर मुलांना पैशाचे आमिष दाखवून टोळीत सहभागी करून घेण्याचे काम पप्पूकडे होते. ४ जानेवारी रोजी दहशतवादी विरोधी पथकाने हाजी बाबाला घुघ्घुस येथून अटक केली. हाजी बाबाला अटक होताच त्याच्या टोळीतील सदस्य हादरले. हाजी बाबाजवळून पथकाने एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त केली होती. इतर काडतुसे कालूकडे असल्याची कबुली त्याने दिली. त्यामुळे पोलिस कालूच्या मागे लागले होते.

अटकपूर्व जामीन घेण्यासाठी कालू बुधवारी नागपुरात येताच पथकाने त्याला अटक केली. त्याच्याजवळ १० ते १२ जिवंत काडतुसे सापडली. त्यानंतर गुरुवारी सकाळी पिंटूला वणी येथून उचलण्यात आले. त्याच्याजवळदेखील एक पिस्तूल सापडले. मात्र, काडतुसे मिळून आली नाही. त्यामुळे पिंटूने कुणाला काडतुसे दिली याचा पोलिस शोध घेत आहेत. हाजी बाबा, कालू आणि पिंटू यांना न्यायालयात हजर करून पोलिसांनी त्यांची ११ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी तीन आरोपींना पोलीस कोठडी तर एकाला न्यायालयीन कोठडी

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT