NCP sakal
विदर्भ

गोंडपिपरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बँनर फाडले; कार्यकर्त्यांत संताप

शरद युवा संवाद यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस जनसामान्यांशी जुळवून घेण्याकरिता विविध ठिकाणी रँलीव्दारे वातावरण निर्मीती करीत आहे.

संदीप रायपूरे

शरद युवा संवाद यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस जनसामान्यांशी जुळवून घेण्याकरिता विविध ठिकाणी रँलीव्दारे वातावरण निर्मीती करीत आहे.

गोंडपिपरी - शरद युवा संवाद यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस जनसामान्यांशी जुळवून घेण्याकरिता विविध ठिकाणी रँलीव्दारे वातावरण निर्मीती करीत आहे. गोंडपिपरी येथे नुकतेच शरद युवा संवाद यात्रा आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्रसिंह चंदेल, नगरसेवक सविता चंदेल यांच्या उपस्थीतीत गोंडपिंपरीत संवाद यात्रा काढण्यात आली.

संवाद यात्रेचे स्वागत करण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष महेंद्रसिंह चंदेल, नगरसेविका सविता चंदेल यांनी गोंडपिपरी नगराच्या प्रमूख ठिकाणी बँनर लावले होते. संवाद यात्रा कार्यक्रम झाला. पण त्याच रात्री नगरात लावलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन बँनर फाडण्यात आले.

गोंडपिपरी नगराच्या प्रारंभी असलेल्या चिंतामणी काँलेजसमोर व ज्या ठिकाणी संवाद कार्यक्रम झाला. त्या धनोजे कुणबी समाज सभागृहासमोरील मार्गावर असे दोन बँनर पुर्णपणे फाडण्यात आले. दरम्यान सकाळी हा प्रकार माहित होताच कार्यकर्त्यांनी तिव्र नाराजी व्यक्त करीत संताप व्यक्त केला.

बँनर फाडणारे नेमके कोण याचा शोध आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते घेत आहेत. गोंडपिपरीत पोलीसांनी लावलेली सिसिटिव्ही व्यवस्था विस्कळीत झाली आहे. त्यामुळे रात्री होत असलेले गुन्हे उजेडात येत नाही. त्यामुळे तात्काळ सिसिटिव्ही व्यवस्था सूरळीत करण्याची मागणी समोर येत आहे. स्वागताचे बँनर फाडल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भडकले. त्यांनी ठाणेदारांना याची माहिती दिली.

बँनर फाडून विरोधकांना आनंद झाला असेल. पण अशापध्दतीन विरोध करणे हे अशोभनीय आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीची ताकत वाढत आहे.अनेक युवक आमच्यासोबत जुळत आहेत.

- महेंद्रसिंह चंदेल, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Miracle: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT