Neha Mane sakal
विदर्भ

NEET Exam Result : उमरखेडच्या नेहाची ‘नीट’ मध्ये गगनभरारी! ७२० पैकी ७२० गुण घेत देशातून प्रथम रँकवर

नुकताच नीटचा निकाल लागला असून यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील नेहा कुलदीप माने ही ७२० पैकी ७२० गुण घेऊन प्रथम आल्याचा मान तिने मिळविला आहे.

सकाळ वृत्तसेवा

उमरखेड (जि. यवतमाळ) - नुकताच नीटचा निकाल लागला असून यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील नेहा कुलदीप माने ही ७२० पैकी ७२० गुण घेऊन प्रथम आल्याचा मान तिने मिळविला आहे.

तालुक्यातील बोरी चातारी येथील शिक्षक असलेले कुलदीप माने यांची नेहा ही मुलगी असून उमरखेड ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक तथा सेवानिवृत्त लघु पाटबंधारे विभागाचे एसडीओ रामराव माने पाटील यांची नात आहे. नेहा माने हिने देश पातळीवरील वैद्यकीय प्रवेशासंबंधीची परीक्षा नीट परीक्षेत ७२० पैकी ७२० गुण मिळवून उमरखेड तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात एक मोठे उत्तुंग यश मिळवले.

नेहाची एम्समध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे. नेहा वर्ग पहिली ते आठवी श्री गुरुदेव गोरोबा विद्यालय, उमरखेड येथे, वर्ग नववी ते दहावी महात्मा फुले विद्यालय नांदेड येथे व पुढील अकरावी व बारावी गोदावरी कनिष्ठ महाविद्यालय, नांदेड येथे शिकली. नांदेड येथेच तिने नीटचे वर्ग लावले होते.

तिला दहावीत ९७ टक्के तर बारावीमध्ये ८१ टक्के गुण होते. पहिल्याच प्रयत्नात तिने या परीक्षेत हे यश संपादन केले. तिने तिच्या यशाचे श्रेय आजोबा रामराव माने, आजी, आई, वडील व छोटी बहीण निधी हिला दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT