danger 
विदर्भ

कोरोना विरुद्धची लढाई सुरूच आणि उंबरठ्यावर आणखी एक!

सूरज पाटील

यवतमाळ : राज्यातील यंत्रणा "कोविड-१९'विरुद्घ मार्च महिन्यापासून नॉनस्टॉप लढते आहे. हे संकट कायम असतानाच गुजरात राज्यातील बोताड व कच्छ या जिल्ह्यात जनावरांपासून मानवाला होणाऱ्या "सीसीएचएफ'आजाराचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. उपचार व निदानाअभावी ३० टक्‍क्‍यापर्यंत मृत्यू होण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर पशुसंवर्धन विभागाच्या पश्‍चिम विभागीय रोगनिदान प्रयोगशाळेने "अलर्ट' राहण्याचे निर्देश दिले आहेत.

मानवजातीवर कोरोनाचे संकट आले आहे. तर, जनावरे लंपी नावाच्या आजाराने बेजार आहेत. अशातच गुजरात राज्यातील बोताड व कच्छ या जिल्ह्यांत "क्रिमीयन कांगो हॅमोरेजीक फिवर'(सीसीएचएफ) या रोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये आढळून आला आहे. हा झुनोटीक स्वरूपाचा आजार (जनावरांपासून मानवाला होणारा रोग) असून, याचा प्रादुर्भाव यापूर्वी कोंगो, दक्षिण अफ्रीका, चीन, हंगेरी, इराण या देशात झाल्याचा इतिहास आहे.

हा रोग नॅरो व्हायरस या विषाणूमुळे होत असून, हा विषाणू मुख्येत्व हायलोम्मा या जातीच्या गोचिडाद्वारे एका जनावरांपासून दुसऱ्या जनावराला व बाधित जनावरांपासून मानवांमध्ये संक्रमित होतो. या रोगामुळे पाळीव जनावरांमध्ये (गाई, म्हशी, शेळ्या मेंढ्या आदी.), शहामृग पक्ष्यांमध्ये रोगाची कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. अशीच बाधित जनावरे, पक्षी या विषाणूंचे वाहक म्हणून कार्यरत राहतात. अशा वाहक जनावरांच्या संपर्कात आलेल्या मानवांना (जनावरांचे मालक, संपर्कातील व्यक्ती, खाटीक, पशुचिकीत्सक, कर्मचारी) या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्‍यता असते.

मानवामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव अत्यंत घातक असल्याचे दिसून आले आहे. बाधित व्यक्तींपैकी ३० टक्‍क्‍यांपर्यंत व्यक्ती त्वरीत निदान व उपचार न झाल्यास मृत्यू पावण्याची शक्‍यता असते. सीसीएचएफ विषाणूजन्य रोगाविरुद्घ प्रभावी व हमखास उपयुक्त असे उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे बाह्य किटकांचे उच्चाटन प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. महाराष्ट्र राज्य गुजरातला लागून असल्याने या रोगाचा प्रादुर्भाव राज्यात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे रोगाचा प्रसार आणि प्रादुर्भाव टाळण्यासाठी अलर्ट राहण्याचे निर्देश पश्‍चित रोग निदान प्रयोगशाळेने पशुसंवर्धन विभागाला दिले आहेत.

"सीसीएचएफ'चा धोका
"सीसीएचएफ'रोगाचा प्रादुर्भाव गुजरात राज्यात आढळून आल्याचे पत्र नुकतचे आम्हाला प्राप्त झाले आहे. जनावरांपासून मानवाला होणारा हा आजार असून, मृत्यू नऊ ते ३० टक्‍क्‍यापर्यंत होऊ शकतात. पशुपालकांनी हातांनी गोचिड काढू नये, औषधाद्वारेच गोचिड निर्मुलन करावे. गोठ्यांची नियमित सफाई करावी, प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्‍यक आहे.
डॉ. राजीव खेरडे
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, यवतमाळ.

ही आहेत लक्षणे
बाधित झालेल्या व्यक्तींमध्ये सुरुवातीला डोकेदुखी, जास्त ताप येणे, सांधेदुखी, पोटदुखी, उलटी, आदी लक्षणे दिसून येतात. आजारी व्यक्तींचे डोळे लाल दिसतात. घशात तसेच तोंडातील वरच्या भागात लाल ठिपके दिसतात. आजार बळावल्यास त्वचेखालील रक्तस्त्राव, नाकातून रक्तस्त्राव, लघवीतून रक्तस्त्राव अशी विविध लक्षणे दिसून येतात. काही रुग्णांत काविळसारखी लक्षणे दिसतात.

दक्षता आवश्‍यक
पशुंचे मास चांगल्याप्रकारे शिजवून खावे, आजारी जनावरांवर उपचार करताना वापरण्यात येणाऱ्या सामुग्रीचे निर्जुंतुकीरण करून विल्हेवाट लावावी. पशुवैद्यकांनी हॅण्डग्लोव्हज, मास्क, संरक्षक चष्मा आदीचा वापर करावा. बाजारात विविध ठिकाणाहून जनावरे येतात. व्यावसायिकांना योग्यप्रकारे मार्गदर्शन करण्यात यावे, जनावरांची तपासणी करावी, अंगावर गोचिड आढळल्यास त्यांना कळपापासून वेगळे करावे, त्यांच्यावर ताबडतोब प्रतिबंधक औषधाची फवारणी करावी, अशाप्रकारे दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आंतरराज्य सीमेवर तपासणी
गुजरातमधून गीर गाय, मेहसाना, जाफ्राबादी म्हशी तसेच शेळ्या मोठ्या प्रमाणात येतात. गुजरात राज्यात हा रोग नियंत्रणात येत नाही. तोपर्यंत खरेदी विक्रीचे व्यवहार टाळावे. आंतरराज्य सीमा रेषेवरील तपासी नाक्‍यामध्ये राज्यात येणाऱ्या पशुधनाची तपासणी करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Liam Livingstone ला १३ कोटी देण्याची खरच गरज होती का? काव्या मानरच्या निर्णयावर होतेय टीका, मोहम्मद शमीचं नाव ओढलं जातंय... कारण

Kalyan Dombivli Elections: कल्याण डोंबिवलीत ठाकरे एकजुटीचे राजकीय संकेत; महापालिका रणधुमाळीपूर्वी हालचालींना वेग

Ambani gifts Lionel Messi : अनंत अंबानींकडून मेस्सीला 11 कोटींचं घड्याळ भेट! एवढं महाग का आहे Richard Mille घडयाळ? काय आहे खास?

Germany Jobs: ‘मेड इन महाराष्ट्र’ मनुष्यबळाला जर्मनीचे दरवाजे बंद? १० हजार तरुणांचे भविष्य टांगणीला

Nashik Marathi Vishwa Sammelan : नाशिकमधील 'मराठी विश्व संमेलन' लांबणीवर; जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीत रंगणार सोहळा!

SCROLL FOR NEXT